12.9 C
New York

Andhericha Raja : अंधेरीच्या राजाच्या मंडपात हे कपडे घालून याल तर…..

Published:

Andhericha Raja : नवसाला पावणारा अशी अंधेरीच्या राजाची ख्याती आहे. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे अंधेरीच्या राजाच गणेशोत्सव 2024 हे वर्ष साजरा केला जात आहे. अंधेरीच्या राजाचे दर्शनाला लांबून भक्त येत असतात. आज अंधेरीच्या राजाचा मुखदर्शन सोहळा धुमधडाक्यामध्ये पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अंधेरीच्या राजाच्या दरबारात ड्रेस कोड ठेवण्यात आलेत. भाविकांना दर्शनासाठी या ड्रेस कोड नुसार सोडण्यात येणार आहे. जर योग्य ड्रेस भाविकांनी परिधान केला नसेल तर त्यांच्यासाठी इतर कपड्यांचे देखील व्यवस्था या मंडळाकडून करण्यात आली आहे. तरुण-तरुणींचा या ड्रेस कोड वरून आक्षेप देखील असू शकतो असे म्हटले जात आहे.

नवसाला पावणारा असा अंधेरीच्या राजाचा मुखदर्शन सोहळा आज पार पडला. अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. तसंच या राज्यासाठी भव्य मंडप बांधण्यात आलं होतं. भाविकांच्या सुरक्षतेसाठी या मंडपात 72 सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा व्यवस्था ही ठेवण्यात आली आहे. अनेक सेलिब्रेटी दरवर्षी अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. 21 सप्टेंबर 2024 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता अंधेरीच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. तसंच मुंबईतील इतर गणेशांचे विसर्जन अनंत चतुर्थीला होत असले तरी अंधेरीच्या राजाचे विसर्जन 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

एस.टी. कर्मचार्‍यांचा संप मागे; मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ

कसा असेल ड्रेस कोड?

जर तुम्हाला अंधेरीच्या राजाच् दर्शन घ्यायचं असेल तर विशेष ड्रेस कोड असणार आहे. हाफ पॅन्ट आणि स्कर्ट परिधान करून मंडपात येणाऱ्यांसाठी पुरुषांसाठी लुंगी आणि महिलांसाठी फुल पँट ठेवण्यात आली आहे. फुल पॅन्ट आणि लुंगी परिधान करून गेल्यावरच बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. हा नियम या गणेश मंडळांने सोळा वर्षांपूर्वी लागू केला असून तो दरवर्षी पाळला जातो.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img