8.4 C
New York

Heavy Rain : ‘या’ भागात पावसाचा कहर, तब्बल 323 रेल्वे गाड्या रद्द, 33 लोकांचा मृत्यू

Published:

गेल्या काही दिवसांपासून तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलं आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात एनडीआरएफ (NDRF) आणि लष्करासह अनेक एजन्सी बचाव आणि मदत कार्य करत असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत आंध्र प्रदेशमध्ये 20 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. 1.80 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहे तर 2,684 किमी लांबीचे रस्ते खराब झाले आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आतापर्यंत मुसळधार पावसामुळे 33 लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक बेघर झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. अनेक शहरांशी संपर्क तुटले असून आज (03 सप्टेंबर) 323 रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला तर 170 गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाड्यात जोर ओसरला; आता ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

तर दुसरीकडे तेलंगणातील कर्मचारी, राजपत्रित अधिकारी, शिक्षक, कामगार आणि पेन्शनधारकांच्या संयुक्त कृती समितीने (JAC) पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 130 कोटी रुपयांचे योगदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही संपूर्ण रक्कम सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या एका दिवसाच्या मूळ पगाराएवढी आहे.

अभिनेता ज्युनियर एनटीआरने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. आंध्रा प्रदेशमध्ये पुराचा सर्वाधिक फटका विजयवाडाला बसला आहे. त्यामुळे आज एनडीआरएफचे आणखी चार पथके चार हेलिकॉप्टरसह बचाव आणि मदतकार्यासाठी पोहोचली आहे. हेलिकॉप्टरने प्रभावित भागात अन्न आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img