23.1 C
New York

Sharad Pawar : ‘जनतेने त्यांची जागा दाखवून दिली … ‘, पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

Published:

येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी जवळपास सर्वच राजकीय पक्ष आपल्या आपल्या तयारीला लागले आहे. यातच मंगळवारी (04 सप्टेंबर) शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) मोठा धक्का देत समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश दिला आहे. समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची कागलमधून उमेदवारी देखील जवळपास निश्चित झाली आहे. तर येत्या काही दिवसात शरद पवार भाजपला आणखी काही मोठे धक्के देण्याची तयारी करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच आज कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आणि आता विधानसभा निवडणुकीत देखील जनता त्यांना जागा दाखवून देणार अशी टीका या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी केली.

‘ते बारकाईने लक्ष देतात अन्…’, शरद पवारांकडून नितीन गडकरींचा कौतुक

या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेला राज्यात बदल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, लोकसभेत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता मात्र त्यांना 200 च्या जवळपास जागा मिळाल्या. जर त्यांना चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांनी समर्थन दिले नसते तर सरकार देखील स्थापन झाले नसते. लोकसभेत जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आणि आता विधानसभेत देखील जनता त्यांना जागा दाखवून देणार अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी दिली. तसेच चंद्रबाबू नायडू आणि नीतिशकुमार दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांचे सामाजिक काम मोठे आहे म्हणून मी त्यांना आमच्याकडे खेचण्याचे काम करणारच नाही. ते मोठे नेते आहे. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar समरजित घाटगे यांना उमेदवार घोषित केलेला नाही

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना समरजित घाटगे यांना आतापर्यंत मी उमेदवार म्हणून घोषित केलेला नाही. जनतेने तो चेहरा निवडला आहे. जनतेच्या डोळ्यांत मी काल पाहिले. त्यांनी समरजित यांना उमेदवार म्हणून पाहिले आहे. असेही या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img