23.1 C
New York

Sharad Pawar : ‘ते बारकाईने लक्ष देतात अन्…’, शरद पवारांकडून नितीन गडकरींचा कौतुक

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर सध्या राज्यातील राजकीय वातारावण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून राज्य सरकारवर चारीही बाजूने टीका होत आहे. महाविकास आघाडीचे (MVA) नेते देखील या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहे. आठ महिन्यापूर्वी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते झाला होता मात्र हा पुतळा आठ महिन्यात कोळल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जर कामाचा दर्जा नीट ठेवायला असता तर पुतळा कोसळला नसता अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसरीकडे आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे अतिशय चांगले काम करणारे नेते आहे आणि त्यांनी जर ते दर्जाबाबत बोलत असतील तर त्यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी दिली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, केंद्रामध्ये नितीन गडकरी हे अतिशय चांगले काम करणारे नेते आहेत. ते कायम कोणतेही काम हाती घेताना बारकाईने त्यात लक्ष देतात त्यांनी अनेक रस्ते केलेत, त्यांचा दर्जा चांगला आहे. त्यांनी जर काही दर्जाबाबत बोलत असतील तर त्यावर राज्य सरकारने लक्ष द्यावे असं शरद पवार म्हणाले.

वडगाव शेरीत भाजप-राष्ट्रवादीचा वाद टोकाला; पंकजा मुंडेंनी क्लिअर सांगितलं

Sharad Pawar नेमकं काय म्हणाले होते नितीन गडकरी ?

दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरी म्हणाले होते की, समुद्रकिनाऱ्यापासून 3 किलोमीटरच्या परिघामध्ये बांधकाम करताना नेहमी स्टेनलेस स्टिलचा अधिक वापर केला पाहिजे. आपण मागील काही वर्षांपासून समुद्रकिनाऱ्यावरीस रस्ते आणि त्यावरचे उड्डाणपूल बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहे. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात देखील स्टेनलेस स्टिलचा वापर केला असता तर तो पुतळा कोसळला नसता असं नितीन गडकरी म्हणाले होते.

Sharad Pawar लोकसभेत जनतेने त्यांची जागा दाखवून दिली : शरद पवार

या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभेला राज्यात बदल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले की, लोकसभेत भाजपने चारशे पारचा नारा दिला होता मात्र त्यांना 200 च्या जवळपास जागा मिळाल्या. जर त्यांना चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांनी समर्थन दिले नसते तर सरकार देखील स्थापन झाले नसते. लोकसभेत जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आणि आता विधानसभेत देखील जनता त्यांना जागा दाखवून देणार अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img