8.7 C
New York

Sharad pawar : खोटा शिवरायांचा इतिहास जनतेसमोर मांडू नका, पवारांचा फडणवीसांना टोला

Published:

शिवरायांनी सुरतेची लूट केली नसून त्यांनी सुरतेवर आक्रमण केल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर तो मुद्दा उटलून धरत टीका केली होती. या मुद्यावरून आधी जितेंद्र आव्हाड, नंतर संजय राऊत यांनी फडणवीसांवर आणि सरकारवर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी देखील निशाणा साधला आहे. ‘ वस्तुस्थिती वेगळी असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं. आणि त्यामध्ये त्यांनी असं ध्वनित केलं की अशी लूट करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं नव्हतं. आणि चुकीच्या पद्धतीन इतिहास मांडण्याचं काम केलं जात आहे. ‘ असं शरद पवार म्हणाले. राज्यकर्त्यांकडून शिवरायांबाबत वेगळी विधानं केली जात आहेत. खोटा इतिहास हा जनतेसमोर, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांना टोला हाणला. शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे दोनदा सूरतेवर स्वारी केली होती, असं इतिहासकार सांगतात. , ती स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, असं पवार म्हणाले.

या सरकारचा शेतकरी लाडका कधी होणार? राऊतांचा सवाल

Sharad pawar शिल्पकाराला अुनभव कमी, एवढं मोठं काम देणं योग्य नव्हतं

राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या पुतळ्याचं काम ज्यांना दिलं, त्या व्यक्तीचं (जयदीप आपटे) या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता. एवढं मोठं (पुतळ्याचं) काम त्याने कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना, त्याच्यावर ही जबाबदारी टाकणं , एवढं मोठं काम देणं हे योग्य नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

वाऱ्याच्या वेगामुळे किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं कारण मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक सांगत आहेत. पण अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत.मुंबईत इंडिया गेटच्याजवळ, समुद्रकिनारी जो पुतळा आहे तो कित्येक वर्षांपासून उभा आहे, त्याला काही झालेलं नाही. त्यामुळे मालवणमध्ये जो पुतळा कोसळला,त्याबाबत जी कारण सांगितली जात आहेत, ती योग्य आहेत असं दिसंत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारला फटकारलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img