आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झालीयं. अशातच आता पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात (Wadgaon Sheri) भाजप-राष्ट्रवादीचा वाद विकोपाला गेला असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाने भाजपच्या उमेदवाराचं काम केलं नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलायं. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला वडगाव शेरीची जागा भाजपचा द्यावी, अन्यथा आम्ही काम करणार नसल्याचा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलायं. या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या आदेशानूसार भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बैठक घेतली. वडगाव शेरीच्या जागेबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, पक्षाचा आदेशच अंतिम असून सर्व कार्यकर्ते पाळणार असल्याचं पंकजा मुंडेंनी क्लिअर सांगितलंय.
मागील दोन टर्मपासून अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. अजित पवार गट सत्तेत सामिल झाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूका महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्रित लढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेच्या तिकीटासाठी अनेक मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातीलच एक म्हणजे वडगावशेरी मतदारसंघ. या मतदारसंघात पार पडलेल्या बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा भाजपलाच देण्यात यावी, असा आग्रह धरलायं. तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही. त्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ भाजपकडे ठेवा, अशी तक्रार मतदारसंघाचे अध्यक्ष अर्जून जगताप यांनी मुंडे यांच्याकडे केलीयं. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजपचा वाद विकोपाला जाणार असल्याची शक्यता आहे.
नाना पटोलेंना मराठा आंदोलकांचा घेराव; पटोले म्हणाले
Pankaja Munde पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
कोणत्याही कार्यकर्त्यांचा असा फिडबॅक नसतो. प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षातील नेते कार्यकर्ते आपापल्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्या असं सांगतात. हे नैसर्गिक आहे, प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला वाटतं की, आपल्या पक्षाला जागा मिळावी. याबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते, दिल्लीतले नेते निर्णय घेतात. कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणे गैर नाही. भाजपचा कार्यकर्ता शिस्तबद्ध आहे. पक्षाचा आदेश अंतिम मानून कामाला लागणार असल्याचं पंकजा मुंडेंनी क्लिअर सांगितलंय.
Pankaja Munde अर्जून जगताप यांची तक्रार काय?
महायुतीतील तिन्ही घटक पक्ष लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आहेत. लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुरलीधर मोहोळ यांचं काम केलं नाही. त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपला मिळावी अन्यथा आम्ही काम करणार नाही, अशी तक्रार जगताप यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर केलीयं.
Pankaja Munde वडगाव शेरीसाठी जगदीश मुळीक यांचा दावा
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दावा केला आहे. सध्या या मतदार संघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार असल्याने महायुतीत वादाची शक्यता आहे. मात्र महायुतीत जागावाटप होण्याआधीच जगदीश मुळीक यांनी आगामी विधानसभा निवडणूक वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा दावा केला आहे. तसे फ्लेक्स मुळीक यांच्या समर्थकांकडून मतदारसंघात लावल्याचं दिसून आलं होतं..