28.9 C
New York

Paris Paralympics : सुमीत अंतिलने पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकत केला नवा विश्वविक्रम

Published:

भारताच्या सुमीत अंतिलने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. (Paris Paralympics) सुमीतने यावेळी पॅरालिम्पिकमधील रेकॉर्ड मोडीत काढला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुमीतने यावेळी ७९०.५९ मीटर भाला फेकला आणि सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे भारताला सोमवारी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये १४ पदकांपर्यंत मजल मारता आली. भाताच्या शीतल देवीवर सर्वांच्या नजरा होत्या. शीतल देवी आणि राकेश कुमार हे तिरंदाजीच्या मिश्र दुहेरीत कांस्यपदकसाठी लढत होते. भारताने यावेळी इराणच्या संघावर अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. त्यामुळे भारताला यावेळी कांस्यपदक मिळवता आले. भारताला यावेळी बॅडमिंटनमध्ये चौथे पदक मिळाले.

हॉट फेव्हरेट म्हणून स्पर्धेत उतरलेल्या सुमितने आपले वचन पूर्ण केले आणि रेकॉर्डब्रेक कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूने त्याच्या 6 थ्रो दरम्यान दोनदा स्वतःचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला. पॅरिस येथील अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नातच त्याने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सेट केलेला आपलाच रेकॉर्ड मोडीत काढत यंदाच्या स्पर्धेत सुवर्ण पदकाची दावेदारी जळवास पक्की केली होती. त्याच्या नव्या पॅरालिम्पिक रेकॉर्डसह त्याने याच प्रयत्नातून भारतासाठी यंदाच्या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पटकावले.

Paris Paralympics सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले

सुमित अंतिलने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 68.55 मीटर अंतरासह सुवर्णपदक जिंकले. या सामन्यात त्याने टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रम तीनदा मागे टाकला कारण पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नाव्यतिरिक्त त्याने पाचव्या प्रयत्नात 69 मीटरचा टप्पाही पार केला. श्रीलंकेच्या दुलानने 67.03 मीटरच्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले, तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बुरियनने 64.89 मीटरच्या प्रयत्नाने रौप्यपदक जिंकले.

Paris Paralympics सुमित अंतिलच्या नावावरही विश्वविक्रम

सुमित अंतिल भालाफेकच्या F64 श्रेणीचा बादशाह बनला आहे. केवळ पॅरालिम्पिकच नाही तर या स्पर्धेचा विश्वविक्रमही त्याच्या नावावर आहे. 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये त्याने 73.29 मीटर भालाफेक करून नवा विश्वविक्रम केला होता. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचा यशस्वीपणे बचाव करणारा अवनी लेखरानंतर तो आता फक्त दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img