पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आजपासून (03 सप्टेंबर) ब्रुनेई (Brunei) आणि सिंगापूरच्या (Singapore) दौऱ्यावर जाणार आहे. ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया (Sultan Haji Hassanal Bolkiah) यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3-4 सप्टेंबर रोजी ब्रुनेईच्या दौऱ्यावर असणार आहे. ब्रुनेईला भेट देणार नरेंद्र मोदी पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहे. सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सुलतान हाजी हसनल बोलकियाने मोदींना निमंत्रण दिले होते.
नुकतंच भारत आणि ब्रुनेई यांच्यातील राजनैतिक संबंधांना 40 वर्षे पूर्ण झाले आहे. या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 4-5 सप्टेंबरला सिंगापूरला भेट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल 6 वर्षानंतर सिंगापूरला भेट देणार आहे. माहितीनुसार या दौऱ्यावर गुंतवणूक आणि पर्यटनाशी संबंधित विषयांवर दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. भारताच्या दृष्टीने ब्रुनेई आणि सिंगापूरचा दौरा महत्वाचा आहे. याचा कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून या भागात चीनचा प्रभाव वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोदींचा हा दौरा भारत आणि या आसियान देशांमधील मजबूत संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करेल.
PM Narendra Modi ब्रुनेई दौऱ्याचे महत्त्व काय?
पंतप्रधान मोदींच्या ब्रुनेईच्या दौऱ्यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने संगितले की, या दौऱ्यावर पंतप्रधान दोन्ही देशांमध्ये संबंध आणि सहकार्याच्या सर्व पैलूंवर द्विपक्षीय चर्चा करणार आहे तसेच पंतप्रधान मोदी ब्रुनेईसोबत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य आणि गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर या दौऱ्यावर चर्चा करणार असल्याची देखील माहिती यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश, चकमकीत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रुनेईमध्ये तब्बल 14 हजार भारतीय नागरिक राहतात. यामध्ये मोठ्या संख्येने डॉक्टर आणि शिक्षकांचा समावेश आहे. यांचा ब्रुनेईच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात मोठा योगदान आहे. तसेच ब्रुनेई भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि इंडो पॅसिफिक व्हिजनसाठी महत्त्वाचा भागीदार आहे. यावर्षी आम्ही आमच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीला दहा वर्षे पूर्ण करत आहोत त्यामुळे हा दौऱ्या आमच्यासाठी महत्वाचा आहे असेही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले आहे.
PM Narendra Modi सिंगापूर दौऱ्याचे महत्त्व काय ?
या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंगापूरला भेट देणार आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 6 वर्षांपूर्वी सिंगापूरला भेट दिली होती. या दौऱ्यात सिंगापूरमधील उद्योगपती आणि नेत्यांचीही मोदी भेट घेणार आहे. सिंगापूर भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा भाग असल्याने या दौऱ्यावर संरक्षण, सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होणार असल्याची देखील माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली.