26.6 C
New York

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात निक्कीची मनमानी; नियमही मोडलेत

Published:

अत्यंत रंजक वळणावर ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन (Bigg Boss Marathi) येऊन पोहोचला आहे. (Bigg Boss Marathi) पहिल्या दिवसापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे. गेल्या आठवड्यात अरबाजचं (Arbaaz) रौद्र रुप पाहायला मिळालं होतं. यंदाच्या या कठीण आठवड्यात प्रेक्षकांना अनेक नवनवीन ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. या आठवड्यात कोण रद्दी ठरलं हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. सहाव्या आठवड्यातील नॉमिनेशन (Nomination) टास्कमध्ये अनेकांचे नंबर लागले आहेत.

प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) निक्की (Nikki) वर्षा ताईंना (Varsha Tai) म्हणतेय, ‘मी कोणतीही ड्यूटी करणार नाही’. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात ,’तू अशी मनमानी करू शकत नाही’. आजच्या भागात निक्की बिग बॉसचे अनेक नियम मोडताना दिसणार आहे. तर निक्की झोपेचे नाटक करत असल्याने आर्या तिच्यावर थंड पाणी ओतणार असल्याचं म्हणते. बिग बॉस काय शिक्षा आता निक्कीला देणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

Bigg Boss Marathi ‘हे’ सदस्य झालेत नॉमिनेट

‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या आठवड्यात नॉमिनेशन टास्कमध्ये घन:श्याम दरवडे, आर्या जाधव, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, अरबाज पटेल हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. आपला गेम प्लॅन अधिक चांगला आता या सदस्यांपैकी कोण आखणार? कोण सेफ होणार आणि कोण अनसेफ होणार? याकडे ‘बिग बॉस’ प्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Bigg Boss Marathi ‘मी संपलो’; निक्कीचे अंकिताला स्पष्टीकरण

‘बिग बॉस मराठी’चा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. एकीकडे घरात आज कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. अभिजीत आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्की अंकिताला अभिजीतबद्दल सांगताना दिसून येणार आहे.

निक्की अंकिताला म्हणतेय,’माझ्यावरुन जास्त विश्वास अभिजीतचा तुझ्यावर आहे. कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही दोघं सोबत आहात. आमची फ्रेडशिप असली तरी त्याचं तुझ्यासोबत एक वेगळं कनेक्शन आहे. काल तू घराबाहेर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा अभिजीत म्हणाला होता की, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यावरुन वरचा दर्जा तो तुला देतो. त्याला तुझी गरज आहे’.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img