8.4 C
New York

Heavy rain : मराठवाडा, विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपलं

Published:

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू असून या पावसाने मराठवाड्यातील अनेक भागांना अक्षरश: झोडपलं आहे. सर्वाधिक पाऊस परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात झाला असून जनजीवन पावसाचा फटका बसल्याने अतिशय विस्कळीत झालं आहे. अनेक नागरिकांना नदी-नाल्यांना पूर आला असून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. घर, मालमत्ता शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान पावसामुळे झालं असून अनेक ठिकाणी महामार्ग ही पाण्यात गेले आहे. काही ठिकाणी पाण्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत तर काही ठिकाणी पाण्यात अनेक जनावरंही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या २४ तासांत ७१ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे बीड, लातूर, धाराशिव, जालना जिल्ह्यांनाही झोडपून काढले. नांदेड जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं असून अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित आहे. जिल्ह्यतील 45 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. कालपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. खरीप हंगाम पाण्यात गेल्याने शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सावधान! राज्यात येत्या 48 तासांत मुसळधार बरसणार

Heavy rain  परभणीत पिकांचं मोठं नुकसान

परभणी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत झालेल्या पावसाने पिकांतं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. 52 महसूल मंडळापैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून 2 लाख 12 हजार हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोयाबीन, कापूस, मूग, हळद आदी अनेक पिकांचे नुकसान झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सरासरी दोन दिवसात 132 मिलिमीटर इतका पाऊस झाला, या मुसळधार पावसाने वार्षिक सरासरीचा टप्पा पार केला. 1 जून पासून आज पर्यंत 664 मिलिमीटर इतका पाऊस झाला तर वार्षिक सरासरी 615 मिलिमीटर इतकी आहे. काल संध्याकाळपासून पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे.

Heavy rain  हतनूर धरणाचे 20 दरवाजे पूर्ण उघडले

दरम्यान 41 पैकी 20 दरवाजे हतनूर धरणाचे पूर्ण उघडले आहेत, धरणातून 97 हजार 046क्युसेक ने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. मध्यप्रदेश आणि विदर्भात होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. झालेल्या पावसामुळे हातनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली, त्यामुळे आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे कार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img