सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.एकीकडे हा पुतळा कोसळलेला असतानाच दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधून कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला (Chhatrapati Sambhaji Maharaj statue) उभारणी आधीच तडे गेले आहेत, त्यामुळे पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय का? असा सवाल उपस्थित झाला होता.
या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं आहे. हा पुतळा एकीकडे कोसळलेला असतान पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) दुसरीकडे आता उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणीआधीच तडे गेले आहेत. त्यामुळे पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय का? असा सवाल उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंच पुतळा उभारण्यात येत आहे. पुतळा उभारण्यापूर्वी महाराजांच्या पायाला तडे गेला. 47 कोटी रुपये खर्च महापालिका या पुतळ्यासाठी एकूण करणार असून दिल्लीमध्ये या पुतळा साकारुन याचे पार्ट पिंपरीत आणले जात आहे. हा पुतळा प्रत्यक्षात उभारायला 2025 उजाडेल असं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच महाराजांच्या पुतळा असणाऱ्या पायाला तडे गेल्याने काम निकृष्ट दर्जाचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत आत्ताच असा निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल, असं पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे.
‘फडणवीस खुनशी, जादूही करतात’; मनोज जरांगे पाटलांचा घणाघात
शंभूसृष्टी पिंपरी चिंचवडमध्ये उभारली जाणार आहे.या शंभूसृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा 100 फूट उंच पुतळा कांस्य धातूमध्ये उभारला जाईल.पिंपरी चिंचवडमध्ये शंभू सृष्टी उभारली जााणार आहे. या शंभू सृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा (Chhatrapati Sambhaji Maharaj statue) 100 फूट उंच पुतळा कास्य धातूमध्ये उभा केला जाणार आहे. मात्र, हा पुतळा ज्या पायावर उभारला जाणार आहे तो पायांनाच तडे गेले आहेत. सोशल मिडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.