0.5 C
New York

Anti Rape Bill : आता पीडितेला 10 दिवसांत न्याय मिळणार; नराधमाला फाशीच, बंगालमध्ये विधेयक मंजूर

Published:

पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण विधेयक मंजूर करण्यात आलंय. बलात्काराच्या घटनेतील दोषींना 10 दिवसांच्या आत नराधमाला सुळावर चढवण्याता येणार आहे. पश्चिम बंगाल विधीमंडळात ‘अपराजिता महिला’ (Anti Rape Bill ) हे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलं आहे. आता बलात्काराच्या घटनेतील दोषींना 10 दिवसांत फाशी देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलीयं.

काही दिवसांपूर्वी कोलकात्तामधील शासकीय आर.जी. रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये संताप व्यक्त करण्यात आल्याचं दिसून आलं होतं. या घटनेनंतर बंगालमध्ये विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर विधीमंडळाच्या अधिवेशनात अपराजिता अपराजिता महिला आणि बालक हे विधेयक मंजूर करण्यात आलंय.

Anti Rape Bill अपराजिता महिला विधेयकातील 5 तरतुदी :

  • अपराजिता महिला आणि मुले विधेयक 2024 चे उद्दिष्ट महिला आणि मुलांचे संरक्षण मजबूत करणे आहे.
  • बलात्कार घटनेचा तपास 21 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे. तो 15 दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.
  • बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा कोमात गेल्यास दोषीला फाशी दिली जाईल.
  • प्रत्येक जिल्ह्यात डीएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ‘अपराजिता टास्क फोर्स’ स्थापना करणार

बलात्काराच्या घटनेमध्ये पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठीच हे विधेयक मांडण्यात आलं आहे. हे विधेयक सादर करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला माझ्या सर्व बंधू-भगिनींचे आभार मानायचे आहेत, मुलींच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आम्ही रोज लढणार आहोत, ही इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची आणि मुलींच्या हक्कांचे रक्षण करण्याची संधी असल्याचं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, महिलांच्या हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रांनी ‘कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ व्होमन फॉरम्स ऑफ डिस्पिमिनेशन’ समितीची स्थापना केलीयं. महिलांच्या सुरक्षेसाठी आवाज उठवणाऱ्या सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करीत असल्याचंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img