17.6 C
New York

Ahmednagar News : अहमदनगरचं ‘अहिल्यानगर’ होणार; नामांतरास रेल्वे मंत्रालयाचाही ग्रीन सिग्नल..

Published:

अहमदनगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यास केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने हिरवा (Indian Railway) कंदिल दाखवला आहे. अहिल्यानगर नाव देण्‍यास विभागाची कोणतीही हरकत नाही असे पत्र दिल्‍याने जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग (Ahmednagar News) सुकर झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिली. जिल्‍ह्याला पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांचे नाव देण्‍याची मागणी अनेक दिवसांपासून होती. महायुती सरकारने नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक विचार केला. नगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अहिल्यानगर नामांतराच्‍या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्‍या अखत्‍यारीत होत असल्‍याने प्रत्‍येक विभागाची ना हरकत आवश्‍यक असते. केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने नामांतराच्‍या बाबतीत हरकत नसल्‍याचे पत्र जारी केले आहे. अहिल्‍यानगर नावास मान्‍यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्‍वे स्टेशन देशात नसल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पत्रात नमुद केले आहे. नगर जिल्‍ह्याला अहिल्‍यानगर नाव देण्‍यातील पहिला टप्‍पा पूर्ण होत असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.

चुकीला माफी नाही! चक्क केंद्रीय मंत्र्याच्या वाहनावर कारवाई; बिहारमध्ये काय घडलं?

मागील अनेक दिवसांपासून अहमदनगरचे नाव अहिल्यानगर नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शासन दरबारी केली होती. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. एवढंच नाहीतर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती. अहमदनगरच्या नामांतरावरुन विविध समाजांकडूनही मागण्यात करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. तर काही वर्षांपूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर नामांतर व्हावे, अशी मागणी जोर धरु लागली होती. तर दुसरकीकडे अखिल भारतीय समता परिषदेकडून महात्मा फुलेनगर, जैन समाजाकडून आनंदनगर अशी नावे सूचवण्यात आली होती.

त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच आमदार राम शिंदे यांनी मागणी केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहमदनगरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं होतं. अहमदनगरच नामांतर अहिल्यानगर होणारच, असं ठामपणे फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पुढे हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयानेही पत्र पाठवून अहमदगरच्या नामांतरास आमची काहीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img