3 C
New York

Pune Crime : वनराज आंदेकर हत्येप्रकरणी तिघांना अटक, हत्येचं धक्कादायक कारणही उघड

Published:

पुण्यातील नाना पेठेत रराष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर गोळ्या झाडून कोयत्याने (Pune Crime) वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. आंदेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.

वनराज आंदेकर यांच्या हत्येमागचं धक्कादायक कारणंही समोर आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयांनीच आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कौटुंबिक वाद आणि पैशाच्या वादातून आरोपींनी त्यांची हत्या केली. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील मध्यवर्ती भागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनराज आंदेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे. वनराज आंदेकर यांच्या निकटवर्तीयाने पूर्वीच्या वैमनस्यातून हा गोळीबार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पुण्याचे सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, रविवारी (1 सप्टेंबर) रात्री 9.39 वाजता नाना पेठे परिसरात दोघेजण उभे होते. दरम्यान, काही अज्ञात व्यक्तींनी आंदेकर यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर 5 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे हादरले! हडपसरमध्ये फायनान्स कंपनीच्या मॅनजेरची निर्घृण हत्या

Pune Crime नेमकी घटना काय?

सविस्तर वृत्त असे की, वनराज आंदेकर हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले असून शूटर फरार झाले आहेत. चौकातील दिवे बंद असताना आणि ते एकटाच असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घरगुती कार्यक्रम असल्याने आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन-चार जणांनी आधी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी आंदेकर यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

Pune Crime पुण्यात 12 तासांत दुसरी हत्या

एकीकडे वनराज आंदेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच अवघ्या बारा तासांत पुण्यात आणखी एका खुनाची घटना घडली आहे. हडपसर परिसरातील एका फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची मध्यरात्री हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असे ठार झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. दरम्यान, पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढतांना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक कमी झालाय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img