26.6 C
New York

Mumbai News : लालबागमध्ये भीषण अपघात, भर गर्दीत बस घुसली… नक्की काय झालं ?

Published:

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आलेला असताना मुंबईत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. (Mumbai News) मात्र याच दरम्यान मुंबईतील लालबाग परिसरात एक भयानक घटना घडली आहे. लालबागच्या गजबजलेल्या परिसरात एक बस घुसली आणि अनेक प्रवाशांना तसेच गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघातात 8 ते 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरशी वाद घालत बसचे स्टिअरिंग कसेही फिरवल्याने हा अपघात झाल्याचे समजते. अनेक पादचारी यामध्ये जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होत की रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसून त्यांचेही मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास हा अपघात घडला. बेस्ट बसची मार्गिका क्रमांक 66 ही बस लालबागहून जात होती. बसचे ड्रायव्हर कमलेश प्रजापती ( वय 40) हे चालवत असलेली बस गणेश टॉकीजजवळ पोहोचली, मात्र तेव्हाच दत्ता मुरलीधर शिंदे ( वय 40) याने जबरदस्तीने स्टीअरिंग व्हीलवर ताबा मिळवत ते डावीकडे फिरवले. मात्र चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस धाडकन समोरच्या दोन वाहनांवर धडकली. तसेच काही पादचाऱ्यांनाही बसची जोरात धडक बसली. अचानक बस वेडीवाकडी चालू लागल्याने तेथील नागरिक घाबरले आणि एकच पळापळ झाली. यामध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंत बस चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर पाच राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू…

घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारांसाठी लगेचच जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना फ्रॅक्चरही झाल्याची माहिती मिळत आहे, तर इतर नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातास कारणीभूत ठरलेला, मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार येण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितलं. शिंद याने बस ड्रायव्हरशी वाद घातला. बस गणेश टॉकीज परिसरात पोहोचली आणि तेवढ्यात त्याने अचानक स्टेअरिंग पकडलं. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img