1.1 C
New York

Prajkta Mali : प्राजक्ता माळीने अखेर सांगितलं लग्न न करण्याचं कारण……

Published:

Prajkta Mali : मराठी सिनेसृष्टीतील प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तसच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्राजक्ता चाहत्यांच्या मनाचा ठेका घेते. प्राजक्ता जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहोचली. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेने प्राजक्ताला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये प्राजक्ताने काम केलं आहे. तसंच तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सोशल मीडिया वरूननेहमीच ती आपल्या चाहत्यांना करिअर आणि रियल लाईफ मधील अपडेट देत असते.

यशाचा शिखर गाठलेली प्राजक्ता मात्र आपल्या रियल लाईफ मध्ये मात्र अद्याप सिंगल आहे. तिच्या लव लाइफ बद्दल अनेकदा विचारण्यात आल आहे. तसंच नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने प्रेमात पडल्याचाही खुलासा केला आहे. मात्र सर्वांची क्रश असलेली प्राजक्ता लग्न करणार कधी? असा प्रश्न मात्र तिच्या चाहत्यांना पडलाय. पण या सगळ्यांवरती उत्तर देत लग्न न करण्यामागचं कारण प्राजक्ताने सांगितलय. तसंच तिला लग्नाची भीती वाटत असल्याचाही तिने खुलासा केलाय.

नितेश राणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा…; नगरमध्ये मुस्लिम समाज आक्रमक

मला लग्न, कमिटमेंटची भीती वाटते. मला स्वतःची कंपनी आणि सिंगल राहायला आवडतं आणि ती मी एन्जॉय करते असं देखील प्राजक्ता माळीने म्हटले आहे . प्राजक्ता माळी 2013 पासून मुंबईत एकटी राहते. तसंच त्यामुळे तिला स्वातंत्र्याची सवय लागली आहे. एक कलाकार म्हणून मी मुक्त आहे. सध्याच्या लग्न संस्था ज्याप्रमाणे विस्कळीत होतायेत त्यामुळे मला जास्त भीती वाटत आहे. पण, मी प्रेमामध्ये देखील पडली आहे. त्याच्यानंतर समोरचा मुलगा माती खातोय असं मला कळलं त्यामुळे दोन-तीन वेळा मी माघार देखील घेतली आहे.

प्राजक्ताने सुवासिनी मालिकेतून त्याच्यानंतर टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केल्यावर नकटीच्या लग्नाला सावधान, जुळून येती रेशीमगाठी या मालिकांमध्ये देखील काम केलं. तसंच तांदळा, पांडू, खो-खो ,चंद्रमुखी या सिनेमांमध्ये देखील तिने आपली भूमिका साकारली. तसंच रान बाजार या वेब सिरीज मध्ये ही प्राजक्ताने काम केलय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img