23.1 C
New York

Sanjay Raut : महाराजांचा पुतळा पुतळा तुटला नाही तर तोडलात; राऊतांचा गंभीर आरोप

Published:

राज्यातील वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी तापत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. काँग्रेसने मात्र, ते लोकांना इतके वर्ष शिकवले, असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी आता राज्यातील राजकारण रंगताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही म्हटले की, देवेंद्र फडणवीस हे पेशवाईचे उत्तराधिकारी आहेत. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, हे तुमचं पाप आहे. पुतळा तुटला नाही तुम्हीच तोडलात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. (Sanjay Raut alleged that the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Malvan was broken)

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, ज्या शेवटच्या पेशव्यांनी बाळाजी विश्वनाथाने पुण्यात शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य लयास नेलं, शनिवारवाड्यावर ब्रिटिशांचा यूनियन जॅक ध्वज फडकावला, त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी अशी भाषा केली नसती, हे आम्हाला दुर्दैवाने बोलावे लागते आहे. देवेंद्र फडणवीस कोणता इतिहास सांगत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत, संघर्ष करत आहोत आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता. छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देण्यास विरोध करत आहात. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, हे तुमचं पाप आहे. पुतळा तुटला नाही तुम्हीच तोडलात. त्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करणारे आजही मोकाट आहेत. त्यांना तुम्ही अटक करू शकत नाहीत. कारण ते तुमचे पेशवाईचे शिलेदार आहेत.

फडणवीसांचा इतिहास वेगळा, राऊतांचे प्रत्युत्तर 

शिवसैनिक जेव्हा आदित्य ठाकरे यांच्या नैतृत्वाखाली मालवणमध्ये गेले. तेव्हा जयंत पाटील किंवा आमच्या अन्य लोकांना मालवणच्या किल्ल्यावर जाण्यापासून रोखण्याचे काम भाजपाचे गुंड करत होते, त्यांचे तुम्ही समर्थक आहात. पोलिसांच्या अंगावर धावून जाणारे तुमचे हे गुंड आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवणार आहेत का? तुम्हाला महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करणारे तुम्ही आहात. हे तुमच्या मनामध्ये आहे की नाही. आपण शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तोडून वेगळा विदर्भ करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, ही घोषणा कोणाची होती. जर तुम्ही शिवाजी महाराजांचे खरे भक्त असाल तर बेळगाव आणि कारवारच्या प्रश्नाविषयी तुमची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

Sanjay Raut राष्ट्रीय सुरक्षेसाठी महाराजांनी दोनदा सुरत लुटली

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य हे मराठी माणसाचं आणि मावळ्याचं राज्य होतं. पण तुम्ही ते संपवायला निघालेला आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली नाही. हा तुमचा एक नवीन चिंतनाचा विषय तुम्ही समोर आणला आहे. तुम्हाला इतिहास काय माहिती. तुम्ही इतिहास कधी शिकलात? किंबहुना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे तुम्ही शत्रु आहात. शिवाजी महाराज यांनी एकदा नाही तर दोनदा लुटली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी सुरत लुटली. सुरतचे व्यापारी ईस्ट इंडिया कंपनीला मोठ्या प्रमाणावर खंडणी देत होते. हा स्वराज्य द्रौह आहे, राष्ट्रद्रौह आहे, ही शिवाजी महाराज यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी ठरवंल की, ईस्ट इंडिया कंपनीला मिळणारी खंडणी बंद करायची असेल, तर सुरत लुटावी लागेल आणि व्यापाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. हा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी काळजीपूर्वक वाचावा, नाही तर आम्ही त्यांच्याकडे इतिहासाचा मास्तर पाठवतो, अशी मिश्किल टिप्पणीही संजय राऊत यांनी केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img