23.4 C
New York

Kolkata : भाजप पहिल्यांदाच देणार ममतांना बॅनर्जीना पाठिंबा

Published:

Kolkata – पश्चिम बंगालमध्ये कोलकता रेप – मर्डर प्रकरणाने दररोज उद्रेक होत असल्याने ममता बॅनर्जी यांच्यावरचा दबाव आता दिवसेंदिवस वाढत चाललाय. भाजपने या प्रकरणावरून ममता सरकारला पुरते घेतले आहे. त्यामुळे आता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन ममता बॅनर्जी यांनी या घटना रोखण्यासाठी महत्त्वाचे विधेयक पारित करण्याचा निर्णय घेतलाय.

काही दिवसांपूर्वी ममताने बलात्कार विरोधी कायदा करण्याचे जाहीर केले होते. अत्यंत कठोर असा हा कायदा असेल. तसंच दहा दिवसात बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीला मृत्युदंड्याची शिक्षा दिली जाईल, अशी देखील तरतूद्य कायद्यामध्ये असेल,अशी चर्चा आहे.

वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नव्हता ना? राऊतांचा फडणवीसांना टोला

घटनेनंतर ममतांच्या राजीनामाचे मागणी करणाऱ्या भाजपकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाणार आहे. हे विधेयक त्यामुळे सर्वसमंती पारित होण्याची शक्यता आहे. नेहमीच भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये विधानसभेत खडाजंगी होत असते. मात्र भाजप पहिल्यांदाच या विधेयकाच्या निमित्ताने ममतांच्या निर्णयाला पाठिंबा देणार आहे. सोमवारी दुपारनंतर या विधेयकावर चर्चा होणार असल्याचा सांगितले जात आहे. तसंच ममता बॅनर्जी यांच्या राजीनामाचेही मागणी भाजपकडून केली जाईल, अशी शक्यता आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img