8.9 C
New York

Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास वेगळा, राऊतांचे प्रत्युत्तर 

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेप्रकरणी राज्यातील वातावरण तापत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, काँग्रेसनेच शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती. मात्र, काँग्रेसने ते लोकांना इतके वर्ष शिकवले, असा दावा त्यांनी केला. याप्रकरणी आता राज्यातील राजकारण रंगताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही म्हटले की, शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपाने चिंतन करावे. संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut criticized that BJP needs to think about the history of Chhatrapati Shivaji Maharaj)

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना इतिहास समजण्याची गरज आहे. भाजपाचे लोक चिंतन बैठका भरपूर करतात. त्यामुळे त्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मर्दानदी, शौर्य और संघर्षाबाबत चिंतन बैठक बोलवावी. इतिहास समजून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटली नाही. त्यामुळे मला वाटतं की, सुरतचा इतिहास काय आहे आणि सुरत का लुटली हे समजून घेतले पाहिजे. सुरतचे जे व्यापारी मंडळ होते, ते ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होते, आपल्या बचावासाठी. पण हे स्वराज्याच्या विरोधात होते. छत्रपती शिवाजी हिंदवी स्वराज्य बनवू इच्छित होते. त्यामुळे त्यांनी ठरवले की, या व्यापाऱ्यांना लुटले पाहिजे. कारण त्यांचा सर्व पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात होता. त्यामुळे राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मानून छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतवर हल्ला केला आणि सुरतला लुटले. ब्रिटीशांना मदत मिळू नये, म्हणून त्यांनी लुटलं, असे राऊत म्हणाले.’

ऐन विधानसभेपूर्वी अजितदादांच्या अडचणीत वाढ

Sanjay Raut देवेंद्र फडणवीसांचा इतिहास वेगळा

देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळा आहे. त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय घेणेदेणे आहे, हे समजून घेतले पाहिजे. ते इतिहास मोजून संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल टिप्पणी केली आहे. पंडित नेहरू त्यावेळी जेलमध्ये होते. त्यांनी जेलमधून जे पुस्तक लिहिले त्यात, सुरतचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर पंडित नेहरू यांनी माफी मागून हे म्हटले की, मी जेलमध्ये बंद होतो, त्यामुळे माझ्याकडे माहितीची कमी होती. माझ्याकडून चूक झाली आहे, त्यामुळे मी माफी मागतो. ही गोष्ट 70-75 म्हणजेच 1932 ची आहे. पण आता भाजपावाले पुस्तकाची पाने पडताळून इतिहास शोधत आहेत. पण त्यांनी शिवाजी महाराजांचा जो अपमान केला आहे, त्याबद्दल बोलावे. इतिहासात जाण्याची काय गरज आहे.

Sanjay Raut भाजपाने पुतळ्यात झालेल्या भ्रष्टाचारावर बोलावे

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, तुमचे (भाजपा) तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. यानंतर आता मंत्री दिपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला. त्यामुळे भाजपाने मालवणमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात झालेल्या भ्रष्टाचारावर बोलावे. इतर गोष्टी बोलण्याची गरज नाही. महाराजांचा अपमान का आणि कसा केला, यावर त्यांनी बोलावे. तुमची मानसिकता आहे, अशी विचारणाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img