-4.5 C
New York

Vanraj Andekar : वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट, बहिणीनेच दिली होती धमकी…

Published:

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठेतील डोके तालमीसमोर (Doke Talim) वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नाही तर आरोपींनी गोळी झाडल्यानंतर कोयत्यांनी त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली.

काल वनराज आंदेकर यांची नाना पेठ परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आतापर्यंत पोलीसांनी तिघांना केली असून वनराज यांच्या मृतदेहाचे सध्या पोस्टमॉर्टम सुरू आहे. दरम्यान, वनराज यांच्या वडिलांनी समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या दोन मुली आणि दोन मेव्हण्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केलं आहे. वनराज आंदेकर यांच्या खूनाचा कट बहिणीच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचल्याची धक्कादायक माहिती आंदेकर टोळीचा म्होरक्या आणि वनराज यांचे वडील बंडू आंदेकर यांनी पोलीस ठाण्यात दिली. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. वर्चस्वाच्या वादातून सुनेने जावयानेच या कट रचलल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत 10 आरोपींची ओळख पटली असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरु केली आहे.

Vanraj Andekar बहिणीनेच दिली होती धमकी…

दरम्यान, गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई आहे. त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. महापालिकेने अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडले. यानंतर कुटुंबात वाद सुरू झाला. आंदेकर कुटुंबीयांच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर गुंडगिरी करत होता. गणेश कोमकर याने स्वतःची टोळी तयार केली होती. एका भांडणामध्ये मध्यस्थी करून भांडणे मिटवल्याच्या तसेच दुकान अतिक्रमण पाडायला लावल्याच्या रागातून बहिनीने वनराज यांना तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी दिली होती. त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला.

Vanraj Andekar कसा झाली हत्या?

गणेश कोमकर यांनी यापूर्वी शिवसेनेचे शहराध्यक्ष रामभाऊ पारेख यांच्यावर ॲसिड हल्ला केला होता. वनराज आंदेकर यांना आपल्यावर हल्ला होण्याची शक्यता होता. त्यामुळे ते सतत त्यांच्या टोळीतील मुलांसोबत फिरत होते. रविवारी घरगुती कार्यक्रम असल्याने त्यांच्यासोबत कोणीही मूले नव्हती. घरातील कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास अशोक चौकातील डोके तालीमच्या कार्यालयाजवळ ते थांबले. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात वनराज हे गंभीर जखमी झाले होते. चौकातील दिवे बंद असताना आणि ते एकटाच असताना हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घरगुती कार्यक्रम असल्याने आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या तीन-चार जणांनी आधी त्याच्यावर गोळीबार केला. गंभीर जखमी आंदेकर यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img