8.8 C
New York

Sanjay Raut : … हा भाजपचा मूर्खपणा, संजय राऊतांची टीका

Published:

शिवद्रोही सरकारविरोधात आम्ही जोडे मारो (Maha Vikas Aghadi Protest) आंदोलन करणार आहे. आंदोलनाला आंदोलनानं प्रत्युत्तर देणं हा भाजपचा (BJP) मूर्खपणा असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. आम्ही फक्त जोडे मारो करतोय , शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, या सरकारमध्ये वारंवार शिवाजी महाराजांचा अपमान होतो. राज्यपाल कोश्यारी यांनी अपमान केला, माफी मागितली नाही. मंत्र्यांनी अपमान केला माफी मागितली नाही. सध्याचे केसरकर म्हणतात दुःख कशाला करायचे वाईटातून चांगले घडते . ही विकृती आहे. भ्रष्टाचाराची स्पर्धा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असेल त्यांचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री असतील, अजित पवार असतील माफी मागितलं असेल . पण महाराष्ट्र ला संताप व्यक्त करायचा असेल तर तुम्ही थांबवू शकत नाही.

Sanjay Raut शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता : संजय राऊत

आज तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीत अशा आंदोलनाला परवानगी द्यावी लागते. तुम्ही देणार नसाल तर ही दडपशाही , झुंडशाही आहे. जिथे आंदोलन आहे त्य भागात सुट्टी आहे, तरी परवानगी देत नसाल तर हुकूमशाहीची धुंदी वाढली आहे आम्ही फक्त जोडे मारो करतोय , शिवाजी महाराजांच काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता… आम्ही आंदोलन करतोय तर भाजपवाले आंदोलन करत आहेत. हा मुर्खपणा आहे. यांची डोकी फिरली आहेत. शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही आंदोलन करतोय तर हे भाजपचे शतमूर्ख आमच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. 11 वाजता शरद पवार , उद्भव साहेब , नाना पाटोले आणि हजारो कार्यकर्ते पोहचतील आणि राज्यभर आंदोलन सुरू राहील, असे संजय राऊत म्हणाले.

मविआ जोडे मारो आंदोलनावर ठाम, गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद

Sanjay Raut तुम्हाला शिवाजी महाराजाचे नाव घेण्याचा हक्क नाही : संजय राऊत

अडवण्याचा प्रयत्न केला तर अटक करू द्या. सकाळपासून आमच्या बस अडविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मेगा ब्लॉक आहे, मुद्दाम मेगा ब्लॉक वाढवला आहे, म्हणून आम्ही कार्यकर्त्यांना वाहनांनी येण्यास सांगितले पण त्यानं अडवले जात आहे. हे भय का? आम्हाला आंदोलन करु देत नाही. तुम्हाला शिवाजी महाराजाचे नाव घेण्याचा हक्क नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img