-4.5 C
New York

Ramdas Athawale : शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या वाटेवर आठवलेंची ‘आरपीआय’, फूट अटळ?

Published:

Ramdas Athawale : शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या वाटेवर रामदास आठवलेंची ‘आरपीआय’, फूट अटळ?पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात पक्षांतर्गत कलह, गट-तट आणि पक्ष फुटीचं राजकारण पाहायला मिळालं. पक्षातील मतभेदानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत उभी फूट पडली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’तही (आरपीआय ) फूट फडण्याची चिन्हे आहेत.महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील एका गटानं भाजपसोबत पुन्हा युती करावी, अशी मागणी लावून धरली होती. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एका गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे, असे दोन गट पडले.

तर, महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीतील एक गट महायुतीसोबत युती करण्यासाठी आग्रही होता. मात्र, शरद पवारसाहेबांकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 2023 च्या जून महिन्यात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक गट महायुती सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर राष्ट्रवादीतही शरद पवारसाहेब आणि अजितदादा पवार, असे दोन गट निर्माण झाले होते.

महाविकास आघाडीच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला सुरुवात

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर रामदास आठवले यांचा ‘आरपीआय’ पक्षही याच मार्गावर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचं कारण आठवले यांच्या ‘आरपीआय’तील पुणे शहर कार्यकारणीत दोन गट पडले आहेत. त्यात संजय सोनवणे हे एका गटाचे, तर शैलेंद्र चव्हाण दुसऱ्या गटाचे शहराध्यक्ष झाले आहेत.गेल्या आठवड्यात संजय सोनवणे गटाच्या रिपब्लिकन पार्टीने पुण्यात पूरग्रस्तांसाठी मोर्चा काढला होता. त्यामध्ये शैलेंद्र चव्हाण गटातील एकही पदाधिकारी सहभागी झाला नाही. तर शनिवारी शैलेंद्र चव्हाण गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पुण्यात पार पडला. त्यात ‘आरपीआय’च्या दुसऱ्या गटातील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. पुण्यातील ‘आरपीआय’त पडलेल्या उभ्या फुटीचे लोण महाराष्ट्राभर परसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लोण रामदास आठवले थोपविण्यात यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

‘सरकारनामा’शी संवाद साधताना ‘आरपीआय’चे नेते, सिद्धार्थ धेंडे म्हणाले, “आम्ही रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आहोत. आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्याला पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर, शनिवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम वेगळा होता. त्यामुळे त्या कार्यक्रमाला नेत्यांनी उपस्थिती लावली नाही. मात्र, पुणे शहरातील ‘आरपीआय’ पक्ष एकसंघ आहे.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img