सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. तर या प्रकरणावरुन दुसरीकडे विरोधकही आक्रमक झाले आहे. महाविकासआघाडीतर्फे आज सरकारला जोडे मारा आंदोलन केले जाणार आहे. महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) आज रविवारी 1 सप्टेंबर रोजी हे ‘जोडे मारा’ आंदोलन केले जाईल. हे आंदोलन गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळकरण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह या आंदोलनात महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे.
मविआचं ‘जोडो मारो’ आंदोलन, आंदोलन कशासाठी?
Mahavikas Aghadi पोलीस बंदोबस्त तैनात
महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे . गेट ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाविकासआघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mahavikas Aghadi महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार
महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आज भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहेत. शिवरायांच्या पुतळ्यासमोर मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून राज्यव्यापी आंदोलन होणार आहे महाविकास आघाडी.सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा आंदोलन करत आहे त्याचा निषेधार्थ आज सकाळी 9 पासून राज्यभर आंदोलन केली जाणार आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्ग नारायण राणे, रत्नागिरीत रवींद्र चव्हाण, लातूर रावसाहेब दानवे, संभाजीनगर अतुल सावें, भागवत कराड, ठाण्यत निरंजन डावखरे, पालघरात हेमंत सावरा, तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन केली जाणार आहेत.