3.5 C
New York

Eknath Shinde : मविआचं जोडे मारो आंदोलन, मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Published:

विरोधक दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. जातीजातीत तेढ व्हावी महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. खोटं नरेटिव्ह लोकसभेत पसरवून आरक्षण जाणार, संविधान बदलणा… हे होणार ते होणार सांगून लोकांमध्ये भीती पसरवून मते मिळवली. पण माणूस एकदा फसतो. पुन्हा पुन्हा फसत नाही, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

‘चुकीला माफी नाही’; उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाण

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लेकीबाळी सुरक्षित होत्या का. नवनीत राणांना जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं. किती महिलांवर अन्याय केला महाविकास आघाडी सरकारमध्ये. यांना शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा किती अधिकार पोहोचतो माहीत नाही. महाराजांच्या नावाने पण राजकारण करू नये, महाविकास आघाडीवर असा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहीट झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गावागावात शहराशहरात खेड्यापाड्यावर पोहोचली आहे. दुर्देव बघा. काँग्रेसचा माणूस अनिल वडपल्लीवार कोर्टात आडवा झालाय. तो कुणाचा कार्यकर्ता आहे. कुणाचा पोलिंग एजंट आहे. काँग्रेस आणि आघाडीने हायकोर्टातही याचिका केली. ती फेटाळली. आता नागपूरला याचिका केली आहे. पण ही यशस्वी योजना आहे. विरोधक काहीही बोलले तरी लोकांना ही योजना पटली आहे, असं शिंदेंनी म्हटलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img