22.6 C
New York

Chetan Tupe : आमदार चेतन तुपे यांना ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीर

Published:

Chetan Tupe : आमदार चेतन तुपे यांना ‘उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार’ जाहीरहडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना यावर्षीचा “उत्कृष्ट संसद पटू पुरस्कार” जाहीर झालाय. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून मुंबईच्या विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल.

मंत्री गिरीश बापट यांना वीस वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडून येऊन हा पुरस्कार मिळवणारे चेतन तुपे हे पहिले आमदार ठरलेत.

गणेश मूर्तीकलेने दिला जीवनाला आकार

विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात प्रश्न, संसदीय परंपरा, शिष्टाचार यांची जाण, वकृत्व शैली या सर्व बाबी पडताळून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून संबंधित आमदाराची शिफारस यासाठी शिफारस केली जाते. यानंतर राष्ट्रकुल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, रोहिदास पाटील यांना यापूर्वी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img