3.8 C
New York

Sujay Vikhe : ईव्हीएम तपासणी अन् पडताळणीचे ‘ते’ वृत्त चुकीचे

Published:

लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले EVM आणि VVPAT मशीन सुरक्षित होती. त्यात कोणताही छेडछाड झालेली नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) तपासणीत निष्पन्न झालं असून भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्यासह चार जणांचे अर्ज आयोगाने निकाली काढल्याचे वृत्त काही माध्यमांनी प्रकाशित केलं. मात्र, वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिलं.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव केला होता. लंके यांच्याकडून विखे यांचा सुमारे 29 हजार मतांनी पराभव झाला होता. या पराभवानंतर विखे यांनी ईव्हीएमवर संशय घेत 40 मतदान केंद्रावरील EVM आणि VVPAT पडताळणीची मागणी केली होती. त्यासाठी 18 लाख रुपये शुल्कही भरले होते. दरम्यान, विखेंनी सांगितलेल्या केंद्रावरील यंत्रणाची आयोगाने तपासणी केली आणि आज आपला निकाल दिल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले.

‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला

Sujay Vikhe नेमकं वृत्त काय?

EVM आणि VVPAT मशीन सुरक्षित होती. त्यात कोणताही छेडछाड झालेली नाही, त्यामुळं ईव्हीएम सुरक्षित असून या निकालाने विखेंचा अर्ज निकाली निघाला असे या वृत्तात म्हटलं होतं.

Sujay Vikhe जिल्हा निवडणूक प्रशासन काय म्हणाले?

दरम्यान, वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशिर प्रक्रिया सध्या सुरू आहे. सदर याचिका अद्याप प्रलंबित असून EVM आणि VVPAT पडताळणी बाबत औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, लंकेच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका विखे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठात दाखल केली आहे. न्यायालयाने लंकेला समन्स पाठवून 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img