3.8 C
New York

Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताफ्यातील कारचा अपघात

Published:

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेर शहरालगतच्या गणपती मंदिराजवळ घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे काल शुक्रवारी रात्री संगमनेर येथे एका कार्यक्रमासाठी येत होते. त्यांच्या वाहनाचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास संगमनेरजवळ आल्यानंतर हा अपघात झाला.

संगमनेर नगर रस्त्यावरील गणपती मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गतिरोधकावर पालकमंत्र्यांच्या ताफ्यातील एमएच १६ डीजी ५९८४ या क्रमांकाची गाडी आदळली. या वाहनाने अन्य ३ वाहनांना धडक दिली. या अपघातात कारमधील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राधाकृष्ण विखे पाटलांचा ताफा शुक्रवारी रात्री समनापूर गावातून संगमनेरकडे जात होता.

कालची माफी फक्त राजकीय, राऊतांचा मोदींवर घणाघात

त्याचवेळी ताफ्यातील पोलिसांची कार समोरून येणाऱ्या वाहनाला धडकली. अपघातात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य करण्यात आले.जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान या अपघाताची माहिती समजताच अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेतली होती. परंतु तो पर्यंत वाहने निघून गेली होती. तालुक्यात या घटनेचीच चर्चा सुरु होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img