21 C
New York

Devendra Fadnavis : लाडकी बहीण योजनेविरोधात पटोलेंचा माणूस कोर्टात गेलेला; फडणवीसांचा थेट नाव घेऊन आरोप

Published:

माझी लाडकी बहिण योजनेचा मेळावा आज नागपूरमध्ये राज्य सरकारकडून आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही योजना बंद करण्यासाठी काँगेससह नेते अनिल वडपल्लीवार (Anil Vadpalliwar) कोर्टात गेले होते असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेचे 10 टक्के पैसेही महिलांना मिळणार नाही असा आरोप काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीचे (MVA) नेते करत होते मात्र आम्ही आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले आहे. आम्ही ही योजना आणून काही चूक केली का? असा सवाल देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना विचारला.

तसेच आम्हाला ही योजना सुरु ठेव्याची आहे. मात्र काही लोकांना ही योजना बंद करायची आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयात त्यांनी या योजनेविरोधात याचिका दाखल केली होती. अनिल वडपल्लीवार कोण आहे? हे तेच आहे जे नाना पटोलेंचे (Nana Patole) आणि विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते. अनिल वडपल्लीवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

‘पैलवान कुस्ती खेळतात खेळू द्या’, आव्हाडांचा अजित पवारांसह सावंतांना टोला

या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होत आहे त्यामुळे ही योजना बंद करा अशी याचिका त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आम्ही ही योजना बंद करून देणार नाही. यासाठी उच्च न्यायालयात मोठा वकील उभा करू पण योजना बंद करून देणार नाही अशी ग्वाही देखील या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यांची नियत समजून घ्या, हे लोक पहिल्यांदा मुंबईच्या न्यायालयात गेले होते तिकडे त्यांची याचिका घेतली नाही तर आता हे लोकं नागपूरच्या न्यायालयात गेले आहे. मात्र आम्ही ही योजना बंद करणार नाही असेही यावेळी फडणवीस म्हणाले. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना लागू केले आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही देखील राज्यात महिलांना सक्षम करण्यासाठी राज्यात अनेक योजना राबवत आहे असेही या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img