21 C
New York

Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

Published:

तुम्ही जर हार्बर रेल्वेमार्गाने प्रवास करत असाल, (Mumbai Local) तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. वाशी रेल्वेस्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा खोळंबा झालाय. पनवेल येथून सीएसएमटीकडे आणि सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या ठप्प झाल्या आहेत. तर काही लोकल उशिराने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा होत आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्थीचे काम सुरू आहे. प्रवाशांनी संयम बाळगावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पनवेल येथून सीएसएमटी आणि सीएसएमटीकडून पनवेलकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. भल्यापहाटे कामावर निघालेल्या व्यक्तींना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सावधान! राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान

मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. सकाळी साधारण 8 च्या दरम्यान ही ओव्हरहेड वायर तुटल्याने मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे येणारी वाहतूक उशिराने सुरु आहे. गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हार्बर मार्गावरील अनेक लोकल या विविध स्थानकात थांबल्या आहेत. तर काही लोकल या ट्रॅकवरही थांबल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local मध्य रेल्वेने दिली माहिती

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावरील मानखुर्द आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. सध्या ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्याचे काम वेगाने सुरु आहे. तरी या कालावधीत प्रवाशांना काढलेल्या त्याच तिकीट आणि पासचा वापर करत ट्रान्सहार्बर मार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बरद्वारे प्रवास करता येईल. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img