23.1 C
New York

Manoj Jarange : शिवरायांचा राजकारणासाठी वापर केला तर…; जरांगेंचा इशारा

Published:

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळळ्याच्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. दरम्यान, यावर आता मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहेत. एवढ्या मोठ्या स्मारकांबाबत दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याप्रकरणी कोणीही राजकारण करू नये, असं आवाहन करत तुम्ही महापुरुषांच्या नादी लागू नका, तुमचं राजकारण तिकडचं जळू द्या, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला.

पुढं ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करू नये. शेवटी हा राज्यातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या प्रकरणात कोणी दोषी असेल तर त्याला कायमचं आतमध्ये टाकलं पाहिजे. नेत्यांना राजकारण करायला भरपूर जाग आहे. सत्ताधारी असो की विरोधक, या प्रकरणात राजकारण होता कामा नये. अन्यथा जनतेला तुमच्या विरोधात उठाव करावा लागले, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

…नाहीतर काहींना अपचन होतं; फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

पुतळ्याच्या टेंडर प्रक्रियेत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, टेंडर घेणारे हरामखोर आहेत, ज्यांना कशात काय खावं ते कळत नाही. हे टेंडरवाले लोक महापुरूषांचे पुतळे असतील मंदिर असतील यात पण ते खातात. महाविकास आघाडी आणि महायुतीने जर या प्रकरणी राजकारण बंद केलं नाही तर आम्हाला हा मुद्दा हाती घ्यावा लागले, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, यात उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे. घटना तर घडली आहे. त्यामुळे माफी मागितली काय नाही, मागितली काय मात्र आमची मानहानी व्हायची ती झाली आहे. मात्र या प्रकरणात जो कोणी दोषी असेल तो आत गेला पाहिजे.

Manoj Jarange अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन पुकारावं लागेल

सध्या आमचा लढा मराठा आरक्षणासाठी सुरू आहे. त्यानंतर मुस्लिम, धनगर आणि शेतकरी यांच्या प्रश्नांवरही काम करणार आहे. 30 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन पुकारावं लागेल, असा इशारा जरांगेंनी दिला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img