-4.5 C
New York

IMD Rain Alert : सावधान! राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान

Published:

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुठेच पाऊस झालेला नाही. परंतु, आता राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार होत असून लवकरच पावसाला सुरुवात (Heavy Rain) होण्याची शक्यता आहे. आजपासून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला (IMD Rain Alert) आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मु्ंबई शहरासह उपनगरात (Mumbai Rains) पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या 72 तासांत राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल. 3 ते 5 सप्टेंबर या काळात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. आता हा पट्टा मध्य भारताच्या दिशेने पुढे सरकू लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे. यामुळे राज्यातील विदर्भ, मुंबई उपनगर, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत पाऊस होईल अशी शक्यता आहे कोकणातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे.

जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाने ब्रेक घेतला. आता मात्र ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने पुन्हा जोर धरला आहे. राज्यात सर्वत्र पाऊस होऊ लागला आहे. यामुळे शेतातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. अनेक भागात खरीप हंगामातील पिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आता पावसाने हजेरी लावल्याने पिकांना पाणी मिळाले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img