20.6 C
New York

Ajit Pawar : अजितदादांसोबतची युती म्हणजे ‘असंगाशी संग’; शिवसेनेपाठोपाठ आता भाजपनंही सुनावलं

Published:

एकीकडे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील विधानानंतर महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. त्यानंतर आता भाजप नेत्यानेदेखील राष्ट्रवादीविरोधात हत्यार उपसलं असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे आगामीकाळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे. हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांनी केलं आहे. हाके यांच्या वक्तव्यामुळं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ajit Pawar काय म्हणाले हाके?

दुर्दैवाने अजित पवारांच्या (Ajit Pawar) गटाशी युती झालीय. आता भाजप आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गटाशी युती म्हणजे असंगाशी संग, असा टोला गणेश हाकेंनी लगावलाय. अजित पवार गटाने युती धर्म पाळला का? भाजपच्या खासदाराला पाडल्याचाही आरोप हाकेंनी अजित पवार गटावर केलाय.यामुळे महायुतीच्या आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. दुर्देवाने आमच्या सोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती आहे. ही युती ना आम्हाला पटली, ना आम्हाला पटली,असे ते म्हणाले. गणेश हाके हे भाजप प्रदेश प्रवक्ते असल्याने त्यांचे विधान गांभीर्याने घेतले जात आहे.

महायुतीत शाब्दिक युद्ध! भुजबळ म्हणाले….

Ajit Pawar गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरली नाही

गणेश हाके यांच्या राष्ट्रवादीवरील विधानानंतर राष्ट्रवादीच्या गोटातून यावर आता थेट प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. हाके यांच्या विधानावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण म्हणाले की, गणेश हाकेंना विचारुन महायुती ठरलेली नाही. महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या राष्ट्रवादीची नसून, ते गणेश हाके यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांना तिकिट हवं होतं. ते न मिळाल्याने हाके उद्वीग्न झाले असतील असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar माझ्या अंगाला भोकं पडत नाही

सावंत आणि हाके यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापलेले असताना यावर खुद्द अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर फार न बोलता अजितदादांनी अशा कार्यकर्त्यांच्या बोलण्याने माझ्या अंगाला भोकं पडत नसल्याचे पवारांनी म्हणत याला माझे कार्यकर्ते उत्तर देतील असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img