राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले (Maharashtra Elections) आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जास्त (Mahayuti) चढाओढ दिसून येत आहे. अजून जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच अजितदादांनी दबावाचं (Ajit Pawar) राजकारण सुरू केलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) कामगिरी पाहता त्यांना किती जागा मिळतील याची शाश्वती नाही. मात्र अजित पवारांनी आधीच किती जागा पाहिजे आहेत याचा आकडाच सांगून टाकला आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असे अजित पवार म्हणाले. मुंबईत काल (Mumbai News) संध्याकाळी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांनी महायुतीला अनपेक्षित असे वक्तव्य केले. याबरोबरच आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असून ते लवरकरच पक्षात प्रवेश करतील असे अजित पवार म्हणाले.
सुपारी घेऊन मला…” मंत्री तानाजी सावंतांची जीभ पुन्हा घसरली
मुंबईतील वांद्र पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी, नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके असे आमदार आपल्यासोबत आहेत असे अजित पवार म्हणाले. या आमदारांचा लवकरच पक्षात प्रवेश होईल असं संकेत अजित पवार यांनी या बैठकीत दिला.