23.1 C
New York

Bigg Boss Marathi : कोण कोणाला करणार फेव्हर, कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण ठरणार विनर?

Published:

‘बिग बॉस मराठी’ची दणक्यात (Bigg Boss Marathi ) सुरुवात झाली असून सर्वत्र या कार्यक्रमाचीच चर्चा आहे. (Bigg Boss Marathi New Season) ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू होऊन पाच आठवडे होत आहेत. पण तरीही या कार्यक्रमाची क्रेझ कायम आहे. या आठवड्यातील टास्कने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण विजेता होणार आणि कॅप्टनसी मिळवण्यासाठी कोण कोणाला फेव्हर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

‘बिग बॉस मराठी’चा प्रोमो समोर (Bigg Boss Marathi New Promo) आला आहे. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्य कॅप्टनसी टास्क खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये बिग बॉस म्हणत आहेत,”आता वेळ आहे नवा कॅप्टन निवडण्याची”. त्यानंतर घरातील इतर सदस्य म्हणजेच जान्हवी, अंकिता आणि सूरज हे कॅप्टन पदासाठी का योग्य आहेत हे सांगताना दिसत आहेत. पण त्यांच्यात बहुमत होत नसल्याने बिग बॉस बाहेर बसलेल्या सदस्यांना नवा कॅप्टन निवडण्यास सांगतात.

निक्की-अरबाज पुन्हा एकत्र येणार; नवा गेम प्लॅन तर नाही ना?

Bigg Boss Marathi अरबाजने केलं सूरजचं कौतुक

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अरबाज सूरजचं कौतुक करताना दिसणार आहे. अरबाज सूरजचं कौतुक करत म्हणतोय,”आतमध्ये तू खूप चांगलं बोललास. आजकाल खूप छान खेळत आहेस.. तुला कधी काही सल्ला हवा असेल तर मी कायम तुझ्यासाठी हजर असेन. माझ्याविरोधात गेला तरी आवडेल. एका भावाप्रमाणे मी कायम तुझ्यासोबत असेल. तुझा आजचा खेळ तर मला खूप आवडलाय”.

Bigg Boss Marathi निक्की-अरबाज पुन्हा एकत्र येणार

‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन विविध कारणांनी चर्चेत आहे. सध्या घरात टीम ए च्या सदस्यांमध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे. याबरोबरच निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये देखील दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. दोघांमध्ये मोठी भांडणे झालेली गेल्या काही भागात दिसले होते. पण कालच्या भागात मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलून त्यांच्यातील दुरावा कमी केल्याचं पाहायला मिळालं.

‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. प्रोमो मध्ये अरबाजने काचेवर “I Miss You” लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर तो हार्टदेखील काढतो. निक्कीपासून दुरावणं अरबाजला सहन होत नसल्याचं प्रोमोवरून स्पष्ट होत आहे. तर अरबाजला आर्याचा मात्र चांगलाच पाठिंबा मिळत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img