26.6 C
New York

Vadhvan Port : वाढवण बंदरासाठी केंद्राकडून 76 हजार कोटींची तरतूद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Published:

पालघर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज 30 ऑगस्ट महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचा (Vadhvan Port) पायाभरणी कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वाढवण बंदर महाराष्ट्राच्या प्रगतीचं शिखर ठरेल, असे म्हणत हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 76,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील कोस्टल रोडबाबत मोठी घोषणा केली. तसेच वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर जिल्ह्यातील वाढवणमध्ये दाखल झाले आहेत. या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढवण बंदरासाठी केंद्राकडून ७६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आजचा दिवस पालघरच्या इतिहासात व महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासातील सोनेरी दिवस आहे. हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे. महाराष्ट्राला तर याचा फायदा होईलच, पण आपल्या देशाला व पालघरच्या जनतेला सर्वाधिक होईल.आज मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे, मोदींच्या हातात सफलतेचा पारस आहे. जसे भूमिपूजन झाले, तसेच बंदराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल, असा विश्वास व्यक्त करतो असे मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

देशातील पहिल्या दहा बंदरात भारताचा समावेश होईल. जगाच्या नकाशावर डहाणू पालघरचा ही समावेश असणार आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. या बंदरामुळे आयात-निर्यातीला चालना मिळेल. देशात कंटेनर हाताळण्याची क्षमता वाढेल. भारताने जागतिक व्यापारात प्रवेश केला आहे. 12 लाख अधिक रोजगार उपलब्ध होणार आहे. आदिवासींना रोजगार मिळेल. स्थानिक लोकांना विशेष प्रशिक्षण देणारे 30 कार्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत. मच्छिमार आणि स्थानिक लोकांच्या हिताची काळजी घेतली जाईल. मोदी नेहमीच असे प्रकल्प आखतात. यामध्ये स्थानिकांना न्याय मिळाला आहे.

शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी सागरी मार्गांचे महत्त्व ओळखले होते. त्यामुळे महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो. अटल सेतू कोस्टल रोडला जोडलेला आहे. कोस्टल रोडचे विरार ते पालघरपर्यंत विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघरला विमानतळ केल्याबद्दल पंतप्रधानांना अभिमान वाटेल. 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. रोजगार निर्मिती होईल. मुंबईला जागतिक फिनटेक हब बनवण्यासाठी काम करेल. अशी घोषणा मोदींनी केली आहे. 2026 पर्यंत भारताचे 3 ट्रिलियन रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावेल असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

स्थानिकांना रोजगार, नोकरी मिळेल, वाढवण बंदर विकासात मच्छीमार बंदर व स्थानिकांना न्याय दिला जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही, पर्यावरणाची आपण काळजी घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण चालवत आहोत. आता नरीमन पॉईंट पासून कोस्टल रोड विरार, ते पालघर पर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे. सिंगापूर, कोलंबो या बंदरांवर आता भारताला अवलंबून राहावे लागणार नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img