16.9 C
New York

Mumbai Hit and Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार, 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Published:

पुण्यातील कल्याणीनगर (Pune Porshe accident) आणि मुंबईतील (Mumbai Hit and Run) वरळी हिट अँड रन (worli Hit and Run) प्रकरण अद्यापही निकाली निघालं नसताना आणि या भयंकर अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या असतानाच एका अतिशय भयंकर अपघातानं पुन्हा एकदा मुंबई शहर हदारलं आहे. इतका भीषण हा अपघात होता, की 24 वर्षीय तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अल्पवयीन आरोपीसह तीन आरोपींना या अपघातानंतर पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी अल्पवयीन चालक हा नशेत होता, असा आरोप मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केला आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव परिसरात एका भरधाव कारनं दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. भरधाव कारने धडक दिल्यानंतर खांबावर जाऊन धडकली. यावेळी कारमधील चालकासह ४ जण किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर जखमींना जोगेश्वरी पूर्वेकडील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं. या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या भरधाव कारचा चालक अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. वनराई पोलिसांनी सांगितलं की, सदरील कार पोलिसांनी जप्त केली असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. वनराई पोलिसांतर्गत एका दूध विक्रेत्याला स्कॉर्पिओ चालकानं धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वरळीनंतर आता गोरेगावमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. या भीषण घटनेत एका २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी रस्यावर एक हिट अँड रनचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

पुणे आणि वरळी हिट अँड रन प्रकरणात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बार आणि क्लबवर देखील कारवाई करण्यात आली होती. आता वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रॉयल पाम येथील व्हिलामध्ये देखील अशाच दारू पार्ट्या रंगत असल्याच्या अनेक तक्रारी परिसरातील नागरिकांकडून पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र आता एक निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अवैधपणे सुरू असणाऱ्या या व्हिला मधील दारू पार्ट्यांवर पोलीस कारवाई करणार का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img