Thane Crime : महाराष्ट्रात महिला अत्याचाराचं प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढलंय. अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण यामध्ये सर्वाधिक आहे.नुकतीच काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्यांवर तेथील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. नंतर पुन्हा नंदुरबारमध्ये एका सफाई कर्मचाऱ्याने शाळकरी मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवले. आता ठाण्यातही तसाच काहीसा प्रकार उघडकीस आलाय.
आठवीच्या इय्यतेत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला शाळेतील शिक्षकाने मोबाइल वरती पॉर्न व्हिडिओ दाखवले. एवढच नाही तर, तिच्या अंगाला नको त्या ठिकाणी देखील त्यांनी स्पर्श केले. हा सर्व घडलेला प्रकार पीडितेने आपल्या वडिलांना सांगितला. त्यावर त्यांनी तातडीने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. या सर्व प्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलीय. पीडित विद्यार्थिनी भिवंडी येथे राहत असून, ती एका नामांकित शाळेमध्ये शिक्षण घेते. आणि आरोपी देखील शिकवणीला याच शाळेत आहे.
अंतारपूरकर अन् झिशान सिद्धीकींची काँग्रेसमधून हकालपट्टी
बुधवारी पीडित विद्यार्थिनी शाळेत उशिरा आल्यामुळे तिला मुख्याध्यापकाने खडसावले होते.व तिच्या वडिलांना शाळेत बोलावून घेतले होते. मात्र त्या वेळी मुलीने ट्यूब लैंगिक अत्याचाराबद्दल काही सांगितले नाही. मात्र, जेव्हा ती घरी गेली तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या वडिलाना सांगितला. शिक्षक मला मोबाइलवर शिकवणीच्या ऐवजी पॉर्न व्हिडीओ दाखवतो.तसेच मला नको तिकडे हाथ लावतो, अशी तक्रार तिने केली. या संपूर्ण प्रकरणाने एकाच खळबळ माजलीय. त्यामुळे या सर्व घटनाना कधी आळा बसणार असा सवाल उपस्तिथ केला जातोय.