28.9 C
New York

T20 Cricket News : T20 मध्ये दीड हजार चौकार, तरीही रोहित पाचवा, अव्वल कोण?

Published:

टी 20 क्रिकेट म्हटलं की चौकार अन षटकारांचा (T20 Cricket News) पाऊस ठरलेलाच. त्यामुळेच वनडे पेक्षा क्रिकेटचा हा प्रकार जास्त लोकप्रिय ठरला आहे. टी ट्वेण्टी क्रिकेटमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी करणाऱ्या फलंदाजांची कोणतीच कमतरता नाही. तरीही टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे आठ फलंदाज कोण आहेत याची माहिती घेऊ या..

T20 Cricket News क्रिस गेल अव्वल

क्रिस गेल टी 20 मधील सर्वात विस्फोटक फलंदाजांतील एक होता. समोरच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करण्यात गेल माहीर होता. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार गेलच्याच नावावर आहेत. 2188 चौकरांसह गेल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अॅलेक्स हेल्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेल्सने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1949 चौकार लगावले आहेत. डेव्हिड वॉर्नर 1702, किरोन पोलार्ड 1699 चौकरांसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

T20 Cricket News रोहित शर्मा पाचवा, विराट सातवा


टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Pawar) पाचव्या क्रमांकावर आहे. रोहितने आतापर्यंत 1594 चौकार लगावले आहेत. रोहित नंतर सहाव्या क्रमांकावर इंग्लंड संघाचा फलंदाज जोस बटलर आहे. जोस बटलरने आतापर्यंत 1572 चौकार ठोकले आहेत. या यादीत विराट कोहली सातव्या (Viat Kohli) क्रमांकावर आहे. विराटने टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1560 चौकार लगावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरोन फिंच या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. फिंचने टी 20 क्रिकेटमध्ये एकूण 1547 चौकार लगावले आहेत.

T20 Cricket News टी 20 मध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

क्रीस गेल 2188

अलेक्स हेल्स 1949

डेव्हिड वॉर्नर 1702

कीरोन पोलार्ड 1699

रोहित शर्मा 1594

जोस बटलर 1572

विराट कोहली 1560

एरोन फिंच 1547

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img