28.9 C
New York

Sharad Pawar : पश्चिम महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’ सुसाट, पंढरपुरात ‘कमळ’ सुकणार

Published:

विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच शरद पवार यांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसची गाडी सुसाट धावू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपबरोबरच अजितदादांना शरद पवारांनी (Maharashtra Elections) मोठे धक्के दिले आहेत. यातच आता भाजपला पंढरपुरात आणखी एक (pandharpur) धक्का बसण्याची शक्यता दिसू लागली आहे. पंढरपुरातील भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत. वसंत देशमुख पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्षही आहेत. आता देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे. त्यांचा राजीनामा भाजपसाठी अडचणी निर्माण करणारा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीच्या आधी तिकीट मिळण्याची इच्छा व्यक्त करीत इच्छुकांचे पक्षांतर सुरू झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (MVA) दोन्ही बाजूंनी इनकमिंग सुरू झाले आहे. यंदा काँग्रेस आणि शरद पवार गटाकडे इच्छुकांचा कल जास्त दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर शरद पवारांनी अजित पवार आणि भाजपला जोरदार धक्के दिले आहे. इंदापुरात हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. पंढरपुरातील भगिरथ भालके यांचेही तळ्यातमळ्यात सुरू आहे. नगरमध्येही भाजप नेते विवेक कोल्हे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मदन भोसले यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

त्याला शोधणारच..” राजकोट किल्ला पाहणीनंतर अजितदादांचं वक्तव्य

कोल्हापुरातही भाजप नेते समरजितसिंह घाटगे कोणत्याही क्षणी तुतारी हाती घेतील अशी परिस्थिती आहे. निवडणुकीच्या आधीच असे जबर धक्के भाजपला बसण्याची शक्यता आहे. यातच आता पंढरपुरात मोठा धक्का बसला आहे. वसंत देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे. वसंत देशमुख दिवंगत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. परिचारक यांच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच जिल्हा परिषद सदस्यही आहेत. पंढरपूर तालुक्यात त्यांचे राजकीय वजनही आहेत. त्यामुळे जर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर भाजपला मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून उमेदवारी मिळवा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत. यंदा तुतारीचा जो कुणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शरद पवार गटात प्रवेश करावा यासाठी अनेकजण मला भेटले आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर मी तिकीट मागणार आहे. तिकीट मिळालं तर ठीक जरी मिळालं नाही तरी पवार साहेब जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू असेही वसंत देशमुख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img