Nana Patole : छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट येथील पुतळा कोसळल्यावरून विरोधक सत्ताधाऱ्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज पंतप्रधान मोदी पालघरच्या दौऱ्यावरती असल्यामुळे माफी मांगो ‘नरेंद्र मोदी’ आंदोलनाची घोषणा महाविकास आघाडीने केली आहे. त्यामुळे ‘मविआ’ आणि काँग्रेसचे नेते च्या घराच्या बाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केले आहेत. एका प्रकारे त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.
सर्व घटनेवरून महायुती भाजप सरकारवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच भडकलेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारला आम्ही सत्तेत बसू देणार नाही, असा इशारा यावेळी नाना पटोले यांनी दिला.
कोण कोणाला करणार फेव्हर, कॅप्टनसीच्या रेसमध्ये कोण ठरणार विनर?
नरेंद्र मोदी यांच्या पालघर दौऱ्याला आता नाना पटोले यांनी लक्ष्य केल आहे. मोदी जेवढ्या वेळा महाराष्ट्र येतील, तेवढा फायदा MVA ला होईल. मात्र लोकांचा महायुतीला विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा संपूर्ण महाराष्ट्राचा आव्हान आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मांगो आंदोलन माविआ ने छेडलय. त्यामुळे जनता सरकारचा खोटारडेपणा आता सहन करणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.
एक तारखेला महाविकास आघाडी मोर्चा काढत आहे. काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे तिन्ही मिळून मोर्चा काढत आहेत.
माफी मागून चालणार नाही
एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळया प्रकरणात १०० वेळा माफी मागितली. असे म्हटले जात आहे, असे चालत नाही, हा प्रश्न माफीने सुटत नाही. कोण माफीवीर, कोण कमिशनखोर आहे, समृद्धी महामार्गाला तडे गेलेत. सरकार करताय काय? असा टोला नाना पटोले यांनी लगावला.