16.9 C
New York

Malvan : राजकोट किल्लाप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; चेतन पाटील ताब्यात

Published:

छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमधील (Malvan) सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ (Chhatrapati Shivaji Maharaj) असलेल्या राजकोट येथे उभारण्यात आलेला पुतळा कोसळला. या घटनेनंतर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीका केली आहे. यानंतर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाइन करणाऱ्या चेतन पाटील याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुतळ्याप्रकरणी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटीलच्या कोल्हापुरातील घरी जाऊन पोलिसांनी चौकशीही केली होती. त्यानंतर आज मध्यरात्री पोलिसांनी चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे. दुसरा आरोपी जयदीप आपटे मात्र अजूनही फरार आहे.

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना चेतन पाटीलनेच स्ट्रक्चरल डिझाइन केलं होतं. त्यामुळे पुतळा कोसळल्यानंतर पोलिसांनी चेतन पाटीलवरही गुन्हा दाखल केला होता. पुतळा तयार करणारा जयदीप आपटे या तरुणावरही गुन्हा दाखल केला होता. आपटे मात्र अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. चेतन पाटीलला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

‘एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला मी तयार’; शिंदेंनी मागितली माफी!

दरम्यान, याआधी चेतन पाटीलने सर्व आरोप नाकारले होते. या घटनेत माझा काहीच संबंध नाही असे त्यांनी सांगितले होते. राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नसून, माझ्याकडे कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र नाही. मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते. या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते असे पाटील यांनी म्हटले आहे. मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम ठाण्यातील एका कंपनीला देण्यात आल्याचेही चेतन पाटील यांनी म्हटले होते.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात माझे नाव असले तरी, पुतळ्याच्या कामाशी माझा संबंध नसल्याचा दावा पाटील यांनी केला होता. तसेच ज्यावेळी पुरावे सादर करायची वेळ येईल, तेव्हा मी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करेल, असे चेतन पाटील यांनी म्हटले होते. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीतून आणखी काय माहिती हाती येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img