मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आचारसंहितेमुळे राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रशासकीय बदल्या रखडल्या होत्या. शासकीय अधिकारी (Government Officials) आणि कर्मचार्यांच्या बदल्यांचा (Transfers) मुहूर्त केव्हा लागणार असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. त्यातच विधानसभा निवडणुकीचे (Assembly elections) बिगुल केव्हाही वाजू शकते. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याचे संकेत असून यंदा प्रशासकीय बदल्या होणार की नाही, याबाबत चित्र अस्पष्ट होते. त्यातच आता यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या करण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासनाच्या नियमानुसार आणि बदली अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार दरवर्षी साधारणतः एप्रिल ते मे महिन्यामध्ये अखेर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात. मात्र यंदा मे महिन्यात लागू असणाऱ्या आचारसंहितेमुळे राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. मात्र, आता राज्यपालांच्या स्वाक्षरीने अध्यादेश जारी करण्यात आला असून 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बदल्यांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.
31 ऑगस्ट ही अंतिम तारीख दिल्याने दोन दिवसात अधिकार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या बदल्या रखडल्यामुळे तब्बल 39 विभागातील 31 हजार अधिकारी आणि कर्मचारी वेटींगवर आहेत. या बदल्यांकडे सर्व कर्मचारी कर्मचारी बदली कधी होणार? याकडे नजरा लावून आहेत. सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बदल्यांची उत्सुकता लागली आहे. अनेक अधिकारी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत असल्याचं बोललं जाते. त्यामुळे आता कोणत्या विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या होणार? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. पण बदल्यांसाठी फक्त दोनच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे या दोन दिवसात काय काय निर्णय होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.