1.1 C
New York

Gokul Meeting : गोकुळ दूध संघाच्या ६२ व्या सभेदरम्यान राडा, सभासद आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की

Published:

Gokul Meeting : गोकुळ दूध संघ आणि सर्वसाधारण सभेतील राडा हे एकच समीकरण बनले आहे. मात्र त्याला यंदाही अपवाद ठरला नाहीये. विरोधकांनी यंदाच्या गोकुळच्या 62 व्या सभेदरम्यान सभासद सोडण्यावरून गोंधळ घातला. यादरम्यान सभासदांनी बॅरिकेट्स तोडून सभेस्थळी जाण्याचा देखील प्रयत्न केला. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेमध्ये पुन्हा आरोप -प्रत्यारोपांच्या फेरी उडण्याची शक्यता आहे.

गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या प्रांगणात आजची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडत आहे. सत्ताधारी सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध विरोधक म्हणून महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक गट पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. संघाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी गोकुळ दूध संघातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.

गोकुळमधील सभासदांनी ठेवलेल्या ठेवी या सत्ताधाऱ्यांनी मोडून काढल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या सभेमध्ये आता संचालक मंडळ सभासदांना नेमकं काय उत्तर देतात याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.यावेळेस शौमिका महाडिक विरोधी पक्षाच्या संचालिका यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केल. सभासदांनी प्रश्न मांडावेत, असं यावेळेस गोकुळच्या अध्यक्षांनी म्हटलं.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रशासकीय बदल्यांचा मुहूर्त ठरला!

हा प्रश्न विचारल्यावरती शौमिका महाडिक असं म्हणाल्या की, मी पण यातली एक सभासद आहे. परंतु सभासद म्हणून माझा हक्क कोणीही काढून घेऊ शकत नाही. ‘मी माझे प्रश्न बैठकीमध्ये विचारू शकते’.संचालिका आणि पक्षाची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी बैठकीला कधी कधी हजर असते. त्यामुळेच बैठकीला सर्वच संचालक उपस्थित असतात, असं नाही. सत्ताधाऱ्यांना पंधराशे बोगस पास वाटले असा देखील आरोप शौमिका महाडिक यांनी केला.

यावेळेस सतेज पाटील काँग्रेस नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक हे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला. तसंच विरोधकांनी नामंजूरचे फलक घेऊन सत्ताधाऱ्यांच्या ठरावांना यावेळेस विरोध केला. मात्र आपापल्या नेत्यांचे दोन्ही गटा कडून यावेळेस झेंडे भिरकवण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img