28.9 C
New York

Payments : मोबाइल, क्रेडिट कार्ड विसराच.. चेहरा स्कॅन करून होणार पेमेंट; जाणून घ्या

Published:

जरा विचार करून पहा तुम्ही एखाद्या दुकानात किंवा मॉलमध्ये (Make Payments) गेलात. काही वस्तू खरेदी केल्या. पैसे देण्यासाठी मात्र नेहमीसारखे मोबाइल किंवा कार्ड पेमेंट केलेच नाही तर फक्त तुमचा चेहरा दाखवूनच पेमेंट झाले…असं खरंच घडू शकतं का नुसता चेहरा पाहून कसं काय पेमेंट होऊ शकतं. पण, हे खरं आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीच्या फेडरल बँकेने ही (Federal Bank) सुविधा आणली आहे. बँकेने स्माइल पे लाँच केले (SmilePay) आहे. या प्रणालीच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवून पेमेंट केले जाऊ शकेल. यामुळे तुम्हाला कार्ड किंवा मोबाइलद्वारे पैसे देण्याची काहीच गरज राहणार नाही.

Payments स्माइलपे नेमकं काय आहे


फेडरल बँकेने 29 ऑगस्ट 2024 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात म्हटले आहे की स्माइल पे भारतातील अशी पेमेंट सिस्टिम आहे जी युआयडीएआय भीम आधार पे निर्मित फेशियल ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करते. स्माइल पे युजर्सना फक्त आपला चेहरा स्कॅन करावा लागेल. या पद्धतीने ते पैसे देऊ शकतील. फक्त दोन टप्प्यांतच हा व्यवहार पूर्ण होतो अशा पद्धतीने ही सिस्टीम तयार करण्यात आली आहे.

Payments स्माइल पे वैशिष्ट्ये


स्माइल पे द्वारे युजर्सना काही खास वैशिष्ट्ये प्रदान करण्यात आली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा मोबाइल नसला तरीही युजर्सना पैशांचे व्यवहार करता येऊ शकतील. दुकाने किंवा शॉपिंग मॉल्स तसेच अन्य ठिकाणच्या काउंटरवरील गर्दीचे व्यवस्थापन आणि अगदी कमी वेळात आर्थिक व्यवहार सुविधा दिली जाते. युआयडीएआय फेस ऑथेंटिकेशन सेवा द्वारे संचालित सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहार होतील याची खात्री स्माइल पे देते.

Payments कुठे उपलब्ध असेल सुविधा


फेडरल बँकेने दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला ही सुविधा फक्त बँकेच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. यासाठी संबंधित व्यापारी आणि ग्राहक या दोघांचेही फेडरल बँकेत खाते असणे गरजेचे आहे. यानंतर अन्य ग्राहकांनाही या सुविधा उपलब्ध करून देण्याचा बँकेचा विचार आहे. त्यादृष्टीने योजना तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले.

Payments पेमेंट कसे कराल


फेडरल बँकेच्या मर्चंटकडे जाणारे ग्राहक ज्यांच्या मोबाइलमध्ये FED MERCHANT अॅप असेल. ते चेकआऊट वेळी पेमेंट करण्यासाठी Smilepay हा पर्याय निवडू शकतील. संबंधित ग्राहकाचा आधार नंबर नोंदवून FED MERCHANT APP च्या माध्यमातून पेमेंट प्रक्रिया सुरू होते. व्यापाऱ्याच्या मोबाइलमधील कॅमेरा ग्राहकाचा चेहरा स्कॅन करतो. UIDAI प्रणालीत आधीच असलेल्या चेहऱ्याच्या डेटाच्या आधारावर पडताळणी केली जाते. एकदा खात्री झाल्यानंतर ग्राहकाच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यातून पैसे डेबिट होतात. हे पैसे संबंधित व्यापाऱ्याच्या फेडरल बँकेच्या खात्यात जमा होतात.

Payments स्माइलपेचं लिमिट किती


आधार सक्षम देवाणघेवाण प्रणाली आणि भीम आधार पे सेवांसाठी 5 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपये प्रति ग्राहक दरमहा अशी निश्चित करण्यात आली आहे. फेडरल बँकेच्या वेबसाइटनुसार स्माइल पे भीम आधार पे चा उपयोग करते. ही सेवा फेडरल बँकेच्या व्यापाऱ्यांद्वारे बँकेच्या मर्चंट अॅपच्या माध्यमातून मिळू शकते. संबंधित ग्राहकाचा चेहऱ्याचे बायोमेट्रिक्स पडताळणी करून पेमेंट सुविधा उपलब्ध करून देतो. महत्वाचे म्हणजे संबंधित व्यापाराचे आधारकार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. ग्राहकाचेही बँक खाते आधारशी लिंक असावे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img