26.6 C
New York

Shivaji Maharaj Statue : मुख्यमंत्र्यांच्या माफीने विषय सुटतो का? मालवण घटनेवरून राऊतांचा रोखठोक सवाल

Published:

मालवण

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj Statue) पुतळा कोसळल्याच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गेले होते. यावेळी नारायण राणे आणि ठाकरे गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर शु्क्रवारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवरायांची एकदा नाही तर 100 वेळा माफी मागायला तयार आहे. असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली, माफी मागून असे विषय सुटतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत म्हणाले, दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे, अंबादास दानवे या ठिकाणी आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा झाकून ठेवलेला पुतळा आम्हाला दुर्देवाने पाहायला मिळतोय. लातूरच्या भूकंपानंतर हा एवढा मोठा आघात महाराष्ट्राच्या समाज मनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मविआच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. इतकं होऊनही राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय. कारण यामध्ये आर्थिक व्यवहार गुंतले आहेत.

संजय राऊत म्हणाले, आपापल्या ठेकेदारांना कामं देऊन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देखील सोडलं नाही. आसपासच्या घरांवरची कौलं पडली नाहीत. मग पुतळा कसा पडला? अशा शब्दात राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, यावेळी शिवरायांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला. मग वाऱ्यामुळे तुमचे कॅमेरे उडाले नाहीत. बाकीचे शेड पडले नाहीत, त्या दिवशी वाऱ्यामुळे झाडं पडली नाहीत. मात्र, पुतळा पडला. मग किती खोटं बोलणार? हे सरकार भारतीय नौदलावर जबाबदारी ढकलत आहेत. पण भारतीय नौदलाने हिमालयावरही काही स्मारकं उभे केली आहेत. मग तेथे तर बर्फ वितळत असतो. मात्र, या घटनेची जबाबदारी तुम्ही नौदलावर ढकलता. तुम्ही तुमच्या पापाचं खापर त्यांच्यावर फोडत आहात, अशा शब्दात त्यांनी सरकावर हल्लाबोल केला.

संजय राऊत म्हणाले, माफी मागून असे विषय सुटतात का? मग असे अनेक विषय माफी मागून सुटायला पाहिजे होते. आता हे प्रकरण राज्य सरकारच्या गळ्याशी आलेलं आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, मी 100 वेळा माफी मागायला तयार, पण तुमची माफी महाराष्ट्राने स्वीकारली पाहिजे ना? अशा शब्दात त्यांनी सरकावर हल्लाबोल केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img