पालघर
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज पालघर दौऱ्यावर आले होते. 76 हजार कोटींच्या वाढवण बंदराचे (Vadhvan Port) भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. वाढवण बंदर तयार झाल्यानंतर जगातील 10 बंदरांपैकी ते एक असणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 76 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. अति ते अति मोठ्या मालवाहू जहाजांना या येणार आहे. या बंदरामुळे देशाच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेला वेगाने चालना मिळणार आहे. दरम्यान आज पालघर (Palghar) येथील भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते.
वाढवण बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण प्रथम क्रमांकांवर आहोत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता त्यापेक्षा तिप्पट मोठे असे वाढवण बंदर तयार होत आहे. या वाढवण बंदमुळे महाराष्ट्र पुढील 50 वर्षे प्रथम क्रमांकांवर राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाढवण बंदर संकल्पना 1980 मध्ये मांडण्यात आई. संपूर्ण देशात 20 मीटर डीप दराफ्ट हे केवळ वाढवण येथेच आहे, हे लक्षात आले. या ठिकाणी बंदर तयार झाल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल. त्यानंतर 1991 मध्ये सुप्रीम कोर्टाने डहाणूसाठी एक नोटिफिकेशन काढले आणि एक समिती तयार केली. त्यानंतर सगळे जण म्हणत होते आता हे बंदर कधी होणे शक्य नाही. 2014 मध्ये आल्यानंतर आम्ही यावर पर्याय काढला. ज्यामध्ये पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. त्यानंतर केंद्र सरकारने या बंदराला राष्ट्रीय बंदराचा दर्जा दिला.
कोणत्याही देशाच्या इतिहासामध्ये एक अशी स्थिती असते की जी त्या देशासाठी टर्निंग पॉईंट म्हणून काम करते. पुढील 200 वर्षांपर्यंत हे वाढवण बंदर आहे त्यामुळे तुमचे नाव इतिहासात लिहिले जाईल. भारताला पुढे न्यायचे काम कोणी केले असेल तर पंतप्रधान मोदींनी केले. येणाऱ्या काळात मुंबई हे वसई, विरार आणि पालघरच्या दिशेने वाढणार आहे. जर वाढवणच्या शेजारी एक नवीन विमानतळ उभे राहिले तर मुंबईच्या विकासाला, प्रगतीला आणखी वेग मिळेल. या बंदरामुळे जवळपास 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या संधी इथल्याच लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांनाच या ठिकाणी नोकरी दिली जाईल.