Big Boss Marathi : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा आठवडा सध्या जोरदार चर्चेत आहे. या आठवड्यात बिग बॉस च्या घरातील वारे फिरले असून, चांगले मित्र आता वैरी झाले आहेत. त्यासोबतच आता चर्चेत असलेलं बिग बॉस मराठीचं कपल म्हणजे अरबाज आणि निक्की यांच्यामध्येसुद्धा फूट पडलेली दिसून येत आहे.निक्कीच्या विरोधात बिग बॉसचे सदस्य गेले असून, इतर सर्व स्पर्धक आता एक झाले आहेत. एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे अरबाज आणि सूरजसुद्धा आता एकत्र आले आहेत. नुकत्याच कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये अरबाज, सूरजचं कौतुक करताना दिसत आहे.
बिग बॉस मराठीच्या प्रोमोमध्ये सूरजला अरबाज सांगतो आहे की, ‘तू चांगलं बोलला हा आतमध्ये’ नेमकं काय घडलं हे समजून येत नसून ते आजच्या भागात कळेल. अरबाज पुढे सूरजला म्हणतोय की, ‘व्हेरी गुड. तू खूप चांगलं खेळतोय.’ त्यावर सूरज, ‘धन्यवाद’ म्हणतो. ‘तुला कधी कुठे काही करायचं असेल तर तू मला येऊन विचार. एकदम असं भाऊ सारखं सांगणार की असं असं कर म्हणून. कधी माझ्या विरुद्ध जरी असलं तरी सांगणार की, हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. कारण आज तू जे बोललास ना ते मला खूप आवडलं. तू खरंच खूप चांगलं खेळतो आहेस. बेस्ट’ असं म्हणत अरबाज आणि सूरज एकमेकांना मिठी मारतात.
मुख्यमंत्र्यांच्या माफीने विषय सुटतो का? मालवण घटनेवरून राऊतांचा रोखठोक सवाल
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत सूरजला सपोर्ट केला आहे. ‘सुरज आता झापून झुपूक खेळतोय’, ‘गुलिगत सूरज दादा’, ‘प्रेक्षकांची निवड कधी चुकत नसते..’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.दरम्यान, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात कॅप्टन्सीचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. या टास्कसाठी अंकिता-वर्षा ताई, जान्हवी-सूरज आणि धनजंय-वैभव या जोड्या शिल्लक आहेत. मात्र या सहा जणांपैकी कोणीतरी एकच सदस्य कॅप्टन होणार आहे. अशातच कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवरून या सहा जोड्यांना बहुमताने कॅप्टन निवडायचा असतो पण त्यांचा निर्णय होत नाही. त्यामुळे बिग बॉस घरातील इतर सदस्यांना हा निर्णय घेण्यास सांगतात. त्यामुळे या आठवड्याचा कॅप्टन कोण होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.