भाईंदर
मीरा भाईंदरमध्ये (Bhayander) भाजप (BJP) पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात भाजपचे जिल्हा सचिव राजन पांडे (Rajan Pandey) हे गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरानी यांच्या पोटावर आणि मानेवर चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गंभीर जखमी राजन पांडे यांना मीरारोडमधील वोकार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्लीतच हा प्रकार घडला आहे. राजन पांडे हे भाजपचे स्थानिक नेते रवी व्यास यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. याअंतर्गत वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विनोद राजभर, असं राजन पांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही अनेक तरुणाच्या घोळक्यात अडकलेले राजन पांडे दिसत आहेत. हे हल्लेखोर राजन यांना घेरून त्यांना मारहाण करताना दिसत आहे.
हल्लेखोराच्या हातात धारदार शस्त्र असल्याचे दिसते. राजन पांडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करतानाचा व्हिडिओ दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये एक महिला त्याचा बचाव करताना दिसत आहे. एका स्थानिक तरुणीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.