23.1 C
New York

PM Modi : मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो; राजकोट पुतळा प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींची माफी

Published:

मुंबई

राज्यामध्ये सध्या राजकोट (Rajkot) प्रकरणावरुन वातावरण गरम आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivaji Maharaj) पुतळा बसवण्यात आला होता. अवघ्या 8 महिन्यांपूर्वी या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र नौदलाकडून उभारण्यात आलेला हा पुतळा कोसळला. त्यामुळे राज्यातील शिवप्रेमींनी तीव्र रोष व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी माफी मागितली आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, सिंधूदुर्गामध्ये जे झालं ते वाईट झालं. माझ्यासाठी आणि माझ्या साथीदारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. सिंधूदुर्गातील प्रकरणामुळे मी आज नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची चरणावर डोके ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही अशी लोकं नाहीत जी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अर्वाच्च भाषेत बोलणारे आम्ही नाहीत.  देशभक्तांच्या भावना पायदळी तुडवणारे आणि अपमान करणारे आम्ही नाहीत अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. तसेच अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस पक्षाला खडेबोल सुनावले आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img