Adani News : श्रीमंतांच्या यादीत अदानींनी घेतली अंबानींची जागा, पुन्हा पटकावलं अव्वल स्थानअदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी त्यांना मागे टाकत पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावलाय.11.6 कोटी एवढ्या संपत्तीसह त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
‘हुरून इंडिया रीच’ ने ही यादी जाहीर केली. यामध्ये पहिल्या क्रमांकावर अदानि यांचं नाव आहे. 25 टक्क्यांनी मुकेश अंबानींकडे असलेली संपत्ती वाढली असून १०.१४ लाख कोटी रुपये एवढी झाली आहे तर, ११.६ लाख कोटी रुपये एवढी अदानी यांची संपत्ती झाली आहे.
शरद पवारांनी नाकारली झेड प्लस सुरक्षा; CRPF अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
हिंडेनबर्ग ठरला वरदान?
हिंडेनबर्गने अदानींवर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर ही अदानी समूहाने मोठे गरुड झेप घेतली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत अदानींची संपत्ती तब्बल ९५ टक्क्यांनी वाढली आहे. अदानी कुटुंबीयांची एकूण संपत्ती ११,१६१,८०० आहे. यामध्ये अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी, अदानी गॅस आणि अदानी पॉवर या शेअर्सने जवळपास ७६ टक्क्यांनी तेजी नोंदवली आहे.
सलग ५ वर्षांत ६ व्यक्ती टॉप १० मध्ये
सलग ५ वर्षांपासून टॉप १० च्या यादीत ६ व्यक्तींची सारखीच आहेत. यामध्ये गौतम अदानी आणि कुटुंबीय यंदा आघाडीवर असून मुकेश अंबानींनी दुसरा क्रमांक पटकावलाय. तर शिव नाडर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. चौथ्या क्रमांकावर सायरस एस पूनावाला गोपीचंद हिंदुजा आणि राधाकिशन दमानी ही दोन नावे देखील टॉप १० च्या यादीत ५ वर्षांपासून कायम आहेत.